अ‍ॅपशहर

डेंजर दिल्ली! चक्क 'पब्लिक ब्रीज' चोरीला गेला!

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराला उपहासानं गुन्हेगारीचीही राजधानी म्हटलं जातं. त्यात काहीच चुकीचं नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. चक्रावून टाकणारी एक चोरीची घटना दिल्लीत घडली आहे. चक्क एक सरकारी फूटओव्हर ब्रीज इथं चोरीला गेलाय.

Pankhuri Yadav | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Oct 2019, 11:50 am
नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराला उपहासानं गुन्हेगारीचीही राजधानी म्हटलं जातं. त्यात फारसं काहीच चुकीचं नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. चक्रावून टाकणारी एक चोरीची घटना दिल्लीत घडली आहे. चक्क एक सरकारी फूटओव्हर ब्रीज इथं चोरीला गेलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a footover bridge in delhi slowly getting stolen
डेंजर दिल्ली! चक्क 'पब्लिक ब्रीज' चोरीला गेला!


अपहरणाची 'राजधानी' दिल्ली, 'उपराजधानी' मुंबई

अविश्वसनीय वाटत असलं तरी हे खरं आहे. दक्षिण मध्य दिल्लीत ही घटना घडली आहे. नागरिकांना रस्ते सुरक्षितरित्या ओलांडता यावेत यासाठी दिल्लीत अनेक पूल बांधण्यात आले आहेत. जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या जवळ असलेल्या एका गर्दीच्या रस्त्यावर देखील सप्टेंबर २०१० मध्ये असाच एक पूल उभारण्यात आला होता. मात्र, काही दिवसांतच या पुलाचे एकेक पार्ट्स चोरी होऊ लागले. काहींनी एलिव्हेटरचे स्वीच चोरून नेले. काहींनी रेलिंग तर काहींनी पुलाच्या विटाही लांबवल्या. अशा चोऱ्यांमुळं केवळ सांगाडा बनून राहिलेला हा पूल गेल्या दोन वर्षांपासून बंद होता. असं असतानाही त्यावर हात मारले जात होते. नुकतीच या पुलाची शेवटची रेलिंगही चोरीला गेली आहे.

आता या पुलाचं काय करायचं असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. हा पूल उभारण्यासाठी आठ वर्षांपूर्वी सुमारे ४ कोटी रुपये खर्च आला होता. आठवड्याभरात किमान १० हजार लोक याचा वापर करत होते. पूल बंद झाल्यानंतर या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलं असून हा पूल आता चोर आणि नशेबाजांचा अड्डा बनला आहे.

वाचा: दिल्लीत वायूप्रदूषण वाढले

कोणतीही वास्तू तयार होत असताना तिच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. मात्र, संबंधित पुलाच्या बाबतीत चोरीची कुठलीही तक्रार आमच्याकडं आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
लेखकाबद्दल
Pankhuri Yadav

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज