अ‍ॅपशहर

केरळ: ४ महिन्यांच्या चिमुकलीचा करोनाने मृत्यू

केरळमधील मलप्पुरम येथे अवघ्या ४ महिन्यांच्या मुलीचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला. या मुलाला जन्मजात हृदयाशी संबंधित आजार होता. याच कारणामुळे तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2020, 10:31 am
मलप्पुपम (केरळ): जन्मजात हृदयरोग असलेल्या अवघ्या ४ महिन्यांच्या चिमुकलीचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. करोनाटी लागण झाल्यानंतर बाळाला कोझिकोडे मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बरोबर केरळमधील करोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ४ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4-months-baby-dies-of-covid


नैहा फातिमा असे या चिमुकलीचे नाव असून तिला जन्मजात अॅट्रियल सेप्टल हा हृदयाशी संबंधित आजार होता. नैहाला २२ एप्रिल या दिवशी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तिला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने २१ तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नैहा ही पय्यनाडची रहिवासी असून तिला २१ एप्रिलला ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर कोझिकोडी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिला करोनाची लागण कशी झाली याबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

या चिमुकलीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांचीही करोना चाचणी घेण्यात आली. त्यांचे रिपोर्ट्स अद्याप यायचे आहेत. डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना क्वारंटीन होण्याचा सल्ला दिला आहे.

करोना Live: देशात रुग्णांची संख्या २३,४५२ वर

या चिमुरडीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला डॉक्टरांनी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन आणि एझीथ्रोमायसीन ही औषधे दिली. मात्र तरीही या चिमुकलीमध्ये कोणतीही सुधारणा न दिसल्याने डॉक्टरांनी तिला स्टेरॉइड, टॉसिलीझूमब आणि लॉपिनवीर ही औषधे दिली. या मुलीवर अँटीरेट्रोव्हायर उपचार करण्यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली. असे प्रयत्न सुरू असतानाही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही आणि तिला शुक्रवारी सकाळी ६ वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यात तिचा मृत्यू झाला.

करोना रुग्णवाढीचा दर २२ % हून ८ % वर घसरला

त्यानंतर या चिमुकलीवर कोडीकोझे येथे कन्नमपारंबा मशीद येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत दफनविधी करण्यात आला.

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा:

पायांवरील लाल पुरळ करोनाचे लक्षण असू शकते
करोनाने स्वावलंबन शिकवले; मोदींचा सरपंचांशी संवाद
'करोना रुग्णांकडं कलंक म्हणून पाहिल्यास धोका वाढू शकतो'
गुजरातमध्ये करोनारुग्ण वाढले, देशात दुसरा क्रमांक
भारतात करोना मे महिन्यात कमाल मर्यादा गाठणार?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज