अ‍ॅपशहर

डॉक्टरने केली चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया!

आयशाचा उजवा पाय गेल्या वर्षी फ्रॅक्चर झाला होता. त्यात स्टीलची प्लेट टाकण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आयशा ही प्लेट काढण्यासाठी निलांबरमधील ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेली. तिने तिच्या पायाचा एक्स-रे देखील शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांना दाखवला. पण उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरने डाव्या पायावर शस्त्रक्रिया केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2018, 8:02 pm
निलांबर :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम operation


मलप्पुरम मधील एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने एका महिलेच्या चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया केली. उजव्या पायातून स्टील प्लेट काढायची होती, पण डॉक्टरांनी डाव्या पायावर शस्त्रक्रिया केली. आयशा असं या महिलेचं नाव आहे. तिने राज्य आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे.

आयशाचा उजवा पाय गेल्या वर्षी फ्रॅक्चर झाला होता. त्यात स्टीलची प्लेट टाकण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आयशा ही प्लेट काढण्यासाठी निलांबरमधील ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेली. तिने तिच्या पायाचा एक्स-रे देखील शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांना दाखवला. पण उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरने डाव्या पायावर शस्त्रक्रिया केली. डॉक्टर स्वत:ची चूक मात्र मान्य करायला तयार नाही. नंतर त्यांनी पुन्हा उजव्या पायावर शस्त्रक्रिया करून प्लेट काढली. पण पाय चुकल्याचा ठपका मात्र त्यांनी आयशावर ठेवला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज