अ‍ॅपशहर

बँकाबाहेरची रांग ही रांगा संपवण्यासाठीचः मोदी

काँग्रेसने गेल्या ६० वर्षात जनतेला रांगेत उभे केले. कधी साखरेसाठी, कधी रॉकेलसाठी, तर कधी गहू खरेदीसाठी. परंतु बॅँकांच्या बाहेर तुमची ही रांग भविष्यातील रांगा संपवण्यासाठीची शेवटची रांग आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी निर्णयाचे जोरदार समर्थन केले. ते उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद येथील भाजपच्या परिवर्तन रॅलीच्या जाहीर सभेत बोलत होते.

Maharashtra Times 3 Dec 2016, 5:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मोरादाबाद (उत्तर प्रदेश)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a queue to end all queues pm
बँकाबाहेरची रांग ही रांगा संपवण्यासाठीचः मोदी

काँग्रेसने गेल्या ६० वर्षात जनतेला रांगेत उभे केले. कधी साखरेसाठी, कधी रॉकेलसाठी, तर कधी गहू खरेदीसाठी. परंतु बॅँकांच्या बाहेर तुमची ही रांग भविष्यातील रांगा संपवण्यासाठीची शेवटची रांग आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी निर्णयाचे जोरदार समर्थन केले. ते उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद येथील भाजपच्या परिवर्तन रॅलीच्या जाहीर सभेत बोलत होते.

तुम्ही सध्या जी मेहनत करत आहात. कष्ट घेत आहात, ते मी वाया जाऊ देणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले. नोटाबंदीचा निर्णय हा सर्वसामान्य जनतेसाठीच घेतला आहे. नोटाबंदी निर्णयानंतर सध्या प्रामाणिक लोक बँकेच्या रांगेत उभे आहेत आणि अप्रमाणिक लोक गरीबांच्या घराबाहेर रांगा लावून त्यांची दिशाभूल करत आहेत. तुमच्या जन-धन खात्यामध्ये ज्या काळया पैसेवाल्यांनी पैसे जमा केले आहे ते पैसे खात्यातून काढू नका. तो पैसा तुमचाच आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

बेईमानीचे सर्व रस्ते बंद करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. भ्रष्टाचाराने देश लुटला आहे. गरिबांचा हक्क हिसकावला गेला आहे. भ्रष्टाचारामुळे गरिबांचे खूप नुकसान झाले. देशातील सर्व समस्यांचे मूळ हा भ्रष्टाचार आहे. माझी लढाई फक्त काळयापैशाविरुद्ध नसून अप्रामाणिकपणाविरुद्ध आहे. २१ व्या शतकात माझा देश डिजिटल अर्थव्यवस्थेकडे चालला आहे, असे मोदी म्हणाले. कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने भक्कम पावले टाकण्यासाठी त्यांनी देशवासीयांना मोबाईल फोनला पाकिट बनवण्याचेही आवाहन केले.

४० कोटी लोक कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वळले तर, काळया पैशाला मोठया प्रमाणात चाप बसेल. देशाला प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे. जे लोक आधी मनी-मनी करायचे ते आज मोदी-मोदी करतात, असा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना हाणला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज