अ‍ॅपशहर

aadhaar : बँक खात्यासाठी 'आधार' नको

नवीन बँक खाते सुरू करण्यासाठी यापुढे आधार क्रमांक अनिवार्य नसेल. तसेच, नवीन सिम कार्ड घेताना ग्राहकाची ओळख पटवण्यासाठीही आधार क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही

Maharashtra Times 18 Dec 2018, 11:19 am
नवी दिल्ली : नवीन बँक खाते सुरू करण्यासाठी यापुढे आधार क्रमांक अनिवार्य नसेल. तसेच, नवीन सिम कार्ड घेताना ग्राहकाची ओळख पटवण्यासाठीही आधार क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेलिग्राफ कायद्यात ही दुरुस्ती करण्यात आली. या बैठकीत प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यातही सुधारणा करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aadhaar not mandatory for mobile numbers bank accounts as cabinet approves changes to laws
aadhaar : बँक खात्यासाठी 'आधार' नको


या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डबाबत ऐतिहासिक निर्णय देताना खासगी कंपन्यांद्वारे लागू केलेल्या आधार ऑथेंटिकेशनवर प्रतिबंध घातला होता. या निर्णयानंतर दूरसंचार कंपनी आणि फिनटेकने सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ही बंदी उठवण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र केंद्र सरकारने टेलिग्राफ अॅक्टमध्ये दुरुस्ती करून त्यात शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता नव्या नियमानुसार ग्राहकांना नवा मोबाइल फोन घेताना आणि बँक खाते उघडताना १२ अंकी आधार क्रमांक देण्याची सक्ती राहणार नाही, ग्राहकांना वाटलं तर ते हा क्रमांक मोबाइल कंपन्या किंवा बँकांना देऊ शकतात. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कोणतीही आडकाठी राहणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ग्राहकांना दिलासा देताना सिम कार्ड आणि बँक खात्यांना आधार कनेक्शन बंधनकारक करणारं आधार कायद्याचं कलम ५७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं होतं. या नियमाला काहीही कायदेशीर आधार नसल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर आधार कायद्याला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून टेलिग्राफ अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज