अ‍ॅपशहर

'झाडावरचे नारळ तोडा अन् विदेश दौरा करा'

सणांचं औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी जाहिराती व ऑफर्स पाहायला मिळत असतानाच केरळमधील एका छोट्या जाहिरातीनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. तसेच या जाहिरातीची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा होत आहे.

Maharashtra Times 19 Oct 2016, 1:26 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोची (केरळ)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ad says coconut plucker job giving assured foreign trip
'झाडावरचे नारळ तोडा अन् विदेश दौरा करा'


सणांचं औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी जाहिराती व ऑफर्स पाहायला मिळत असतानाच केरळमधील एका छोट्या जाहिरातीनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. तसेच या जाहिरातीची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा होत आहे.

केरळमधील मल्य़ाळी वृत्तपत्रात क्लासिफाईड सेक्शमध्ये नोकरीसाठीची जाहिरात छापली असून त्यात म्हटंलं आहे की, 'झाडावरचे नारळ तोडण्यासाठी कायम तत्वावर (पर्मनंट) कामगार पाहिजे आहे, या कामगाराला चांगला पगार दिला जाईल तसेच त्याला परदेशात जाण्याचीही हमखास संधी दिली जाईल'. नारळ तोडण्याचं काम करणाऱ्यांना विदेशात हमखास जाण्याचं वचन जाहिरातीत दिल्यानं या जाहिरातीची खूपच चर्चा होत आहे. केरळचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजती शंकर यांनी सुद्धा ही जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली आहे.

केरळ हे राज्य नारळासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. केरळ हे नावही नारळाच्या झाडावरून पडलेलं आहे. केरळमध्ये सध्या झाडावरील नारळ तोडण्यासाठी कामगारांची वाणवा आहे. झाडावरचं नारळ तोडण्याचं काम हलक्या दर्जाचे आहे, असं तेथील तरूणांना वाटत असल्यामुळे हे काम करण्यासाठी दिवसेंदिवस कामगारांची संख्या घटली आहे. तरुणांनी नारळ तोडण्याचं काम हे नोकरी म्हणून करावं यासाठीच ही आकर्षित जाहिरात केल्याचं बोललं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज