अ‍ॅपशहर

telegram channel blocked : धक्कादायक! 'बुल्लीबाई' अॅपनंतर आता टेलिग्रामवर वादग्रस्त चॅनेल समोर, IT मंत्री म्हणाले...

बुल्लीबाई अॅप चे प्रकरण सध्या चर्चेत आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केल्याचं सांगण्यात येतंय. आता बुल्लीबाई अॅप प्रमाणेच टेलिग्रामवर एक वादग्रस्त चॅनेल समोर आल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. या प्रकरणी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2022, 12:43 pm
नवी दिल्ली : 'बुल्लीबाई' अॅपचे प्रकरण ताजे असताना आता हिंदू महिलांना कथितपणे लक्ष्य करणारे असेच वादग्रस्त चॅनेल ( Telegram Channel Blocked By It Ministry ) मंगळवारी समोर आले. हे चॅनल क्रॉस-प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये हिंदू महिलांचे फोटो कथितपणे शेअर केले गेले होते. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल ट्विट्सची मालिकाच समोर आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे वादग्रस्त चॅनेल ब्लॉक केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after bulli bai app case telegram channel with derogatory images of hindu women blocked by it ministry
धक्कादायक! 'बुल्लीबाई' अॅपनंतर आता टेलिग्रामवर वादग्रस्त चॅनेल समोर, IT मंत्री म्हणाले...


आयटी मंत्री अश्विनी वैष्णव ( ashwini vaishnaw ) यांनी या प्रकरणी ट्विट करून माहिती दिली आहे. संबंधित वादग्रस्त चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे आणि पुढील कारवाईसाठी केंद्र सरकार राज्य पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

वादग्रस्त चॅनेलवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे ट्विट एका महिलेने आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत केले होते. या महिलेच्या ट्विटला आयटी मंत्री वैष्णव यांनी उत्तर दिले. ते चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे. केंद्र सरकारकडून या कारवाईत समन्वय ठेवला जात आहे, असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. पण कुठल्या राज्याच्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

bulli bai app : 'बुल्लीबाई' अॅपमुळे चर्चेत आलेली १८ वर्षांची श्वेता सिंह आहे तरी कोण? वाचा..

हे चॅनेल गेल्या वर्षी जूनमध्ये तयार करण्यात आला होते. या ग्रुपमधील सदस्यांनी हिंदू महिलांना टार्गेट केल्याचा आरोप, ट्विटरवरील एका तक्रारीतून करण्यात आला होता.

Bulli Bai App Case धक्कादायक: बुल्लीबाई अ‍ॅपमागे १८ वर्षांची तरुणी; 'ते' फोटो तिनेच...

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी 'बुल्लीबाई' प्रकरण हे मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिटकडे सोपवले. विदेशातील होस्टिंग प्लॅटफॉर्मवरून या अॅपबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आणि लवकरच धागेदोरे हाती येतील, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज