अ‍ॅपशहर

...म्हणून त्यानं केली आईच्या पार्टनरची हत्या

मित्रांच्या टोमण्यांमुळे २० वर्षीय तरूणाने त्याच्या आईच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील भजनपुरा परिसरात घडली. मदन मोहन (वय ६१) असे मृत इसमाचे नाव असून प्रेमनाथ असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन मोहन हे सरकारी कर्मचारी होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

Maharashtra Times 24 Jul 2017, 1:08 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after friends taunts boy kills moms live in partner
...म्हणून त्यानं केली आईच्या पार्टनरची हत्या


मित्रांच्या टोमण्यांमुळे २० वर्षीय तरूणाने त्याच्या आईच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील भजनपुरा परिसरात घडली. मदन मोहन (वय ६१) असे मृत इसमाचे नाव असून प्रेमनाथ असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन मोहन हे सरकारी कर्मचारी होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तर त्यांची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या महिलेच्या पतीलाही अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मोहन त्या महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते, मात्र ही बाब त्या महिलेचा मुलगा प्रेमनाथ याला मान्य नव्हती. त्यामुळे तो घरीही येत नसे.
याच मुद्यावरून प्रेमनाथचे मित्रही त्याला अनेकदा चिडवत, टोमणे मारत असत. यामुळे चिडलेल्या प्रेमनाथने एका मित्रासह मदन मोहन यांना ठार करण्याचा कट आखला. शनिवारी ते घरात एकटे असल्याचे पाहून प्रेमनाथने घरात शिरून त्यांची हत्या केली. मात्र तो पळून जात असतानाच शेजाऱ्यांनी त्याला पाहिले आणि पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी प्रेमनाथ व त्याच्या मित्राला अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज