अ‍ॅपशहर

'हिजबुल'ने 'ते' वक्तव्य नाकारले; संघटना सोडण्याचा मूसाचा निर्णय

'हुर्रियतच्या नेत्यांनी काश्मीर प्रश्न हा राजकीय केला, तर त्यांची मुंडकी छाटून लाल चौकात लटकावू' या झाकीर मूसाच्या वक्तव्याशी 'हिजबुल मुजाहिद्दीन'चा काहीही संबंध नसल्याचे संघटनेने जाहीर केल्यानंतर मूसाने हिजबुल मुजाहिद्दीनशी असलेले आपले नाते तोडल्याची घोषणा केली आहे. मूसा गेल्या वर्षी जुलै महिन्यात संघटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.

Maharashtra Times 13 May 2017, 7:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त। श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after his beheading warning to hurriyat zakir musa quits hizbul mujahideen
'हिजबुल'ने 'ते' वक्तव्य नाकारले; संघटना सोडण्याचा मूसाचा निर्णय


'हुर्रियतच्या नेत्यांनी काश्मीर प्रश्न हा राजकीय केला, तर त्यांची मुंडकी छाटून लाल चौकात लटकावू' या झाकीर मूसाच्या वक्तव्याशी 'हिजबुल मुजाहिद्दीन'चा काहीही संबंध नसल्याचे संघटनेने जाहीर केल्यानंतर मूसाने हिजबुल मुजाहिद्दीनशी असलेले आपले नाते तोडल्याची घोषणा केली आहे. मूसा गेल्या वर्षी जुलै महिन्यात संघटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.

मूसाने केलेले वक्तव्य आम्हाला मान्य नसल्याचे हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रवक्ता सलीम हाश्मी याने स्पष्ट केले आहे. हे मूसाचे व्यक्तीगग मत असल्यातेही हाश्मीने म्हटले आहे.

'हिजबुल'च्या या भूमिकेवर एका ऑडिओ संदेशाद्वारे मूसाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात मूसा म्हणतो, 'हिजबुल मुजाहिद्दीनने म्हटले आहे की, त्यांचे माझ्या वक्तव्याशी काही घेणेदेणे नाही. म्हणून, जर हिजबुल मुजाहिद्दीन माझे प्रतिनिधीत्व करत नसेल, तर मी देखील त्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही. आजपासून माझेही हिजबुल मुजाहिद्दीनशी काहीही देणेघेणे नाही. आपण केलेले हे वक्तव्य कुण्या विशेष व्यक्तीबाबत किंवा हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सैयद अली शाह गिलानी यांच्याबाबत मुळीच नाही असेही मूसाने स्पष्ट केले आहे.

जी व्यक्ती इस्लामच्या विरुद्ध आहे आणि एक धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वातंत्र्याची भूमिका मांडते अशा व्यक्तीविरुद्ध आपले वक्तव्य असल्याचे मूसाने पुढे या ऑडिओ संदेशात स्पष्ट केले आहे. मूसा पुढे म्हणतो, 'आम्ही केवळ इस्लामसाठी स्वातंत्र्याची लढाई लढत आहोत. माझे रक्त इस्लामसाठी वाहील आहे, कुण्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी नव्हे.'

आपल्या अंतिम ऑडिओ संदेशानंतर काश्मीरमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही मूसाने म्हटले आहे.

काल (शुक्रवारी) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ संदेशात मूसाने हुर्रियतच्या नेत्यांना हा इशारा दिला आहे. तो आपल्या ऑडिओत म्हणतो, ' मी त्या सर्व हुर्रियत नेत्यांना इशारा देत आहे. त्यांनी आमच्या इस्लामिक लढाईत हस्तक्षेप करू नये. जर त्यांनी हस्तक्षेप केला, तर त्यांची मुंडकी कापून लाल चौकात उलटे लटकावू.

काश्मीरमध्ये शरियत लागू करणे हाच आपल्या संघर्षाचा उद्देश असून काश्मीर मुद्द्याला राजकीय संघर्ष ठरवून उपाय शोधणे हा मुळीच नाही असेही मूसाने स्पष्ट केले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला काश्मिरी लष्कर अधिकारी उमर फैयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिद्दीनचा हात असल्याचे मानले जात आहे हे विशेष.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज