अ‍ॅपशहर

यातूनही वाचलास तर फास लाव! प्रियकराला विष देऊन प्रेयसीचा कॉल; तो अखेरच्या घटका मोजत राहिला

विवाहित प्रेयसीनं प्रियकराला भेटायला बोलावून त्याला विष पाजलं. त्यानंतर तिनं त्याला कॉल केला. प्रियकर मरण पावला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी तिनं कॉल केला होता.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2023, 3:26 pm
लखनऊ: प्रेयसीनं विष देऊन प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तीन कॉल रेकॉर्डिंग समोर आल्या आहेत. अंकित पुंढीरला विष दिल्यानंतर काही वेळानं त्याची प्रेयसी चित्रानं त्याला व्हिडीओ कॉल केला. अंकित मरण पावला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तिनं कॉल केला होता. अंकित मरणाच्या दारात असतानाही चित्रानं फोन केला. त्यावेळी अंकितला श्वास घेताना त्रास होता. यातूनही वाचलास तर फास लावून घे, गुडबाय, असं म्हणत चित्रानं कॉल कट केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime news


उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ परिसरातील डंडेशरी येथे वास्तव्यास असलेल्या अंकित पुंढीर (२२) याचा मृत्यू १७ मार्चला मैनपुरीत झाला. त्याची प्रेयसी चित्रानं त्याला हरयाणाहून फोन करून ऐटा येथे बोलावलं होतं. त्यांच्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग समोर आलं. एका कॉलमधीस संवादानुसार, अंकितला विष देण्यात आलं होतं. तो अखेरचे श्वास घेत असताना चित्रानं त्याला फोन केला होता.
७ रुम, १२ बेड्स, १६ बाटल्या, 'ती' पाकिटं; प्रसिद्ध शाळेवर अचानक धाड; आत नेमकं काय चालायचं?
अंकितनं कॉल उचलला. त्यावेळी त्याचा श्वास सुरू होता. त्याला धाप लागत होती. त्यानं हॅलो म्हटलं. तेव्हा चित्रानं बऱ्याच वेळानंतर त्याला उत्तर दिलं. यातूनही (विष प्यायल्यानंतरही) वाचला असशील तर फास लावून घे, असं चित्रा म्हणाली. त्यावर, अजून काही पाजयाचं असेल तर तेही पाज, असं अंकितनं म्हटलं. यावर असाच जीव दे, असं उत्तर चित्रानं दिलं.

आणखी एका कॉल रेकॉर्डिंगनुसार चित्रानं अंकितला बोलवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकल्याचं स्पष्ट होतं. १६ मार्चला येतो असं अंकित कॉलवर म्हणाला होता. चित्रानं अंकितच्या हत्येची योजना आधीपासूनच आखली होती हे या कॉलमधून स्पष्ट झालं आहे. छातीठोकपणे ये आणि छाती पिटून घे, असं चित्रा या कॉलमध्ये म्हणाली. याबद्दल अंकितनं विचारणा केली असता तिनं विषय बदलला.

अंकितचा चुलतभाऊ शैलेशनं चित्रा, तिचा पती हेमंत यांच्याविरोधात बुलंदशहर पोलीस ठाण्यात आणि चित्राचे भाऊ अमित आणि सनी यांच्याविरोधात एटामध्ये तक्रार दाखल केली आहे. चित्रा आणि अंकित यांचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचं होतं. मात्र चित्राचं कुटुंब तयार नव्हतं. त्यांनी तिचं लग्न बुलंदशहरात राहणाऱ्या हेमंतशी केलं. चित्राच्या भावांनी अंकितला संपवण्याचा पण केला. त्यांनी १२ मार्चला चित्राकडून त्याला फोन लावून घेतला. चित्रानं अंकितला भेटायला बोलावलं. १६ मार्चला नारायण नगरात त्याला विष पाजण्यात आलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख