अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर सलमान खानचा फोटो

उत्तर प्रदेशातील आग्रा विद्यापीठातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर अभिनेता सलमान खान आणि राहुल गांधी यांचे फोटो छापण्यात आल्यानं विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

Maharashtra Times 22 Nov 2017, 12:12 pm
मटा ऑनलाइन वृत्त । आग्रा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम agra university cant find photo of student pastes salman khan picture on marksheet
विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर सलमान खानचा फोटो

उत्तर प्रदेशातील आग्रा विद्यापीठातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर अभिनेता सलमान खान आणि राहुल गांधी यांचे फोटो छापण्यात आल्यानं विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांच्या हातात मार्कशीट देण्याआधी काही अधिकारी निकालांची फेरतपासणी करत असताना त्यात त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. ज्या मार्कशीटवर सलमान खानचा फोटो छापण्यात आलाय ते मार्कशीट अमृता सिंह मेमोरियल डिग्री कॉलेजमधील कला शाखेच्या विद्यार्थ्याचं असून त्याला ३५% गुण मिळाल्याचं समोर आलं आहे. तसेच राहूल गांधी यांचा फोटो छापून आलेल्या मार्कशीटवर विद्यार्थ्याचं नाव असायला हवं त्या ठिकाणी भीमराव आंबेडकर यूनिवर्सिटी असं लिहिण्यात आलंय.त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे.

आग्रा विद्यापीठाच्या निकालाच्या प्रिंटींगचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आलं आहे. या आधीही विद्यार्थ्यांनी कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी केल्याचं सांगितलं आहे. असं असलं तरी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी जीएस शर्मा यांनी अशा कोणत्याही तक्रारी आपल्याकडे आलं नसल्याचं म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज