अ‍ॅपशहर

'ऑगस्टा'मध्ये लाच कुणाला मिळाली ते शोधणार: पर्रिकर

ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाला हे निश्चित आहे. मात्र लाच कुणाला मिळाली हा प्रश्न आहे आणि त्याच्याच शोध सीबीआयकडून सुरू आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभेत झालेल्या चर्चेवेळी सांगितले. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.

Maharashtra Times 4 May 2016, 8:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम agusta westland row defence minister manohar parrikar says in rs there was corruption in the deal
'ऑगस्टा'मध्ये लाच कुणाला मिळाली ते शोधणार: पर्रिकर


ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाला हे निश्चित आहे. मात्र लाच कुणाला मिळाली हा प्रश्न आहे आणि त्याच्याच शोध सीबीआयकडून सुरू आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभेत झालेल्या चर्चेवेळी सांगितले.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात घोटाळा झाला आहे, ही बाब इटलीच्या कोर्टाने देखील मान्य केली आहे. आपल्या देशाला देखील जाणून घ्यायचे आहे की, या भ्रष्टाचारात कोणकोण सहभागी होते, त्यांना कुणाचा पाठिंबा होता आणि या खरेदीत कुणी लाच घेतली? याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.

या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात आयडीएस इन्फोटेकद्वारे पैसे हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती समोर आल्याचेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले. मार्च २००५ नंतर केवळ या कंपनीला फायदा मिळावा म्हणून कराराच्या अटी बदलण्यात आल्या. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी संदर्भात २०१२ मध्ये पहिला रिपोर्ट आला, ज्यामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१४मध्ये सरकारने कंपनीवर कारवाईसंदर्भात पाऊले उचलण्यास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.

या हेलिकॉप्टर खरेदीत केवळ एकाच विक्रेत्याचे नाव रहावे यावर यूपीए सरकारचा जोर होता. यासाठीच नियमांना बाजूला ठेऊन खरेदी करण्यात आली. आमचा काँग्रेसला प्रश्न आहे की, केवळ एकच विक्रेत्याचे नाव का निश्चित करण्यात आले?, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, याआधी सभागृहात सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी देखील तितक्याच जोरदार प्रत्युत्तर दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज