अ‍ॅपशहर

मोदींची 'चाय पे चर्चा'वाला स्टॉल सील!

लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील ज्या स्टॉलवर 'चाय पे चर्चा' करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते तो स्टॉल पालिका प्रशासनाने सील केला आहे. अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या या स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यानेच त्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Maharashtra Times 22 Aug 2016, 11:09 am
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ahmedabad municipal corporation seals modis chai pe charcha venue
मोदींची 'चाय पे चर्चा'वाला स्टॉल सील!


लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील ज्या स्टॉलवर 'चाय पे चर्चा' करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते तो स्टॉल पालिका प्रशासनाने सील केला आहे. अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या या स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यानेच त्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

'इस्कॉन गंथिया', असे या स्टॉलचे नाव असून ५ ऑगस्टलाच हा स्टॉल सील करण्यात आला आहे. या स्टॉलवर येणारे ग्राहक आपल्या गाड्या कुठेही पार्क करतात. त्यामुळे तेथील मार्गाने जाणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या बेकायदा स्टॉलमुळे वाहतूक कोंडीही होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने तसेच प्रत्यक्ष पाहणीतही तसे आढळल्याने पालिकेला कारवाई करावी लागली, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

स्टॉलवर कारवाई करण्याआधी किमान दोन वेळा पालिकेच्या कर निरीक्षकांनी स्टॉल मालकाकडे स्टॉलची कागदपत्रे मागितली. मात्र, त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे न दिल्याने पालिकेने पुढचे पाऊल उचलले असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी फेब्रुवारी २०१४ मध्ये याच स्टॉलवर मोदींचा 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मोदींचा प्रचार करणाऱ्या सिटिझन्स फॉर अकाउंटेबर गव्हर्नन्सच्या (सीएजी) टीमने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सॅटेलाइट, डीटीएच, इंटरनेट आणि मोबाइल अशा माधमातून हा कार्यक्रम सर्वत्र पोहोचवण्यात आला होता. विशेष म्हणजे देशभरातील १ हजार चहावाल्यांशीही मोदींनी या माध्यमातून संवाद साधला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज