अ‍ॅपशहर

लग्न सोहळे दणक्यात; कुठे आहे मंदी?: भाजप मंत्री

विमानं आणि रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. लग्न सोहळेही जोरात सुरू आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे देशात मंदी आहे, असं कसं म्हणता? असा अजब सवाल रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केला आहे. अंगडी यांच्या या तर्कटावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2019, 6:44 pm

Search Results

नवी दिल्ली: विमानं आणि रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. लग्न सोहळेही जोरात सुरू आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे देशात मंदी आहे, असं कसं म्हणता? असा अजब सवाल रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केला आहे. अंगडी यांच्या या तर्कटावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suresh-angadi


दर तीन वर्षाला अर्थव्यवस्था ढेपाळते. त्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्थेला वेग येतो. भारतीय अर्थव्यवस्थाही लवकरच रुळावर येईल, असं सांगतानाच काही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करायची आहे. त्यामुळेच देशात मंदी असल्याचं हे लोक बोलत आहेत. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. देशात लग्नसोहळे जोरात असून विमानं आणि ट्रेनही फुल्ल आहेत. त्यावरून देशात मंदी नाही हे अधोरेखित होतंय, असं तर्कटही अंगडी यांनी मांडलं.

यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं म्हटलं होतं. देशात एक-एक सिनेमा कोट्यावधीचा गल्ला जमवत आहे. त्यामुळे देशात मंदी आहे असं कसं म्हणता? असा सवाल प्रसाद यांनी केला होता. पुराव्यादाखल त्यांनी सिनेउद्योगाचं उदाहरण दिलं होतं. २ ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्था सुदृढ आहे, म्हणून तर चित्रपटांनी एवढी कमाई केली. त्यामुळे देशात मंदी आहे, हे कशाच्या आधारावर बोललं जातंय, असा सवाल त्यांनी केला होता. प्रसाद यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर त्यांनी सारवासारव करत त्यांचं विधान मागे घेतलं होतं.


Web results

कुठं आहे मंदी? सिनेमांची कोट्यवधींची कमाई ...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज