अ‍ॅपशहर

'आकाश’मध्ये गंभीर त्रुटी'कॅग’चा ठपका

नवी दिल्ल‌ी : स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्रामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे. ‘आकाश’चा अपयशाचा दर ३० टक्के असल्याचे शुक्रवारी लोकसभेमध्ये मांडलेल्या अहवालामध्ये ‘कॅग’ने नमूद केले आहे.

Maharashtra Times 29 Jul 2017, 5:10 am
नवी दिल्ल‌ी : स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्रामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे. ‘आकाश’चा अपयशाचा दर ३० टक्के असल्याचे शुक्रवारी लोकसभेमध्ये मांडलेल्या अहवालामध्ये ‘कॅग’ने नमूद केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akash missile reported 30 per cent failure rate cag
'आकाश’मध्ये गंभीर त्रुटी'कॅग’चा ठपका

सन २०१३ ते २०१५ या कालावधीत चीनच्या सीमेवर सहा ठिकाणी ही जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. या कंपनीकडून ही क्षेपणास्त्रे ३,६१९ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१४पर्यंत मिळालेल्या ८० क्षेपणास्त्रांपैकी २० क्षेपणास्त्रांची एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चाचणी घेण्यात आली. मात्र त्यातील सहा क्षेपणास्त्रे ३० टक्के अपयशी ठरली, असे कॅगने म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज