अ‍ॅपशहर

नोटाबंदीमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात?

'नोटाबंदीचा प्रश्न वेळीच न सुटल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो', असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी केंद्र व राज्य सरकारला आज दिला आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन आज आठवडा होतोय परंतु अद्यापही लोकांच्या हाती पुरेसे पैसे पडत नसल्याने लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

Maharashtra Times 14 Nov 2016, 1:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alert state and center on currency note
नोटाबंदीमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात?

'नोटाबंदीचा प्रश्न वेळीच न सुटल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो', असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी केंद्र व राज्य सरकारला आज दिला आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन आज आठवडा होतोय परंतु अद्यापही लोकांच्या हाती पुरेसे पैसे पडत नसल्याने लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे काही लोकांनी स्वागत केले तर काहींनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा अशीही मागणी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या निर्णयानंतर नोटा बदलण्यासाठी बॅंकाबाहेर तसेच एटीएमबाहेर तासनतास रांगा लावणाऱ्या लोकांमध्ये पंतप्रधानांविरुद्ध रोष पाहायला मिळत आहे.

नोटाबंदीचा निर्णय होऊन आठवडा होत आहे. आठवडाभरानंतरही अद्याप एटीएम मशिन्स बंद असल्याने लोकांना पुरेसे पैसे मिळेनासे झाले आहेत. बॅंकेत ठराविक रक्कमेच्या नोटा बदलण्यात येत असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नोटाबंदीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे गरजेचे असून तसे न झाल्यास देशात व राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा आज सुरक्षा यंत्रणानी दिला. सुरक्षा यंत्रणांच्या या इशाऱ्यामुळे लोकांमध्ये केंद्र सरकारविरुद्ध रोष व्यक्त होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज