अ‍ॅपशहर

शहीद जवानांचा आकडा १५ वर

बंदीपुरा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गुरेझ सेक्टरमध्ये हिमपर्वताचा एक विशाल भाग लष्कराच्या शिबिरावर कोसळून बुधवारी त्यात बर्फाखाली अनेक जवान अडकले होते. या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर हाती घेतलेल्या बचावकार्यात सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारपर्यंत १० जवानांचे मृतदेह हाती आले होते. या दुर्घटनेतील मृत जवानांचा आकडा १५वर पोहचला आहे.

Maharashtra Times 28 Jan 2017, 2:41 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम all about avalanches as death toll in kashmir reaches 21
शहीद जवानांचा आकडा १५ वर


बंदीपुरा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गुरेझ सेक्टरमध्ये हिमपर्वताचा एक विशाल भाग लष्कराच्या शिबिरावर कोसळून बुधवारी त्यात बर्फाखाली अनेक जवान अडकले होते. या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर हाती घेतलेल्या बचावकार्यात सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारपर्यंत १० जवानांचे मृतदेह हाती आले होते. या दुर्घटनेतील मृत जवानांचा आकडा १५वर पोहचला आहे.

बनिहालमध्ये शुक्रवारी नव्याने झालेल्या हिमवादळामुळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) बचाव आणि मदतकार्यात अडथळे येत आहेत. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी जम्मू्-श्रीनगर महामार्ग बंद राहिला. दरम्यान, गुरेझमध्ये चार बेपत्ता जवानांचे मृतदेह हाती आले आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी १० जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर सात जवानांची सुटका करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे एका फतेह मुहम्मद मुघल (६०) या वृद्धाचा हिमकड्याखाली सापडून मृत्यू झाला.

गेले चार दिवस काश्मिरात सातत्याने हिमवादळे आणि हिमस्खलनाच्या घटना घडत आहेत. हिमवर्षाव सुरूच असून सरकारने पर्वतीय भागात धोक्याचा इशारा दिला आहे. रामबन जिल्ह्यातील बनिहाल पट्ट्यात शातानी आणि नल्लाह भागात हिमवादळांचा मोठा तडाखा बसल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ‘बीआरओ’चे जवान आणि यंत्रणा युद्धपातळीवर रस्ते मोकळे करण्याच्या प्रयत्नात असून सततच्या हिमवर्षावामुळे यात अडथळे येत आहेत.

आणि मेजर कुगजी वाचले!

बेळगाव : पंधरा फूट बर्फाखाली अडकलेल्या बेळगावमधील मेजर श्रीहरी कुगजी यांच्या जिद्दीसमोर मृत्यूनेही हार मानली आहे. जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये कर्तव्य बजावत असताना झालेल्या हिमस्खलनामुळे छावणीचे छप्पर कोसळून कुगजी १५ फूट बर्फाखाली अडकले. बचाव पथकाच्या दृष्टीस पडणे अशक्य होते.

बर्फ फोडण्यासाठी काही मिळते आहे का, याचा शोध घेताना त्यांच्या हाती ट्रँकेचं कुलूप लागले आणि त्यांनी त्या कुलुपाने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. साधारण तीन तास ते झगडत होते. हळूहळू त्यांचे एकेक बोट बर्फाबाहेर येऊ लागलं. बचाव पथकाला कुगजी यांची बोटे दिसली. त्यानंतर, सहकारी जवानांनी बर्फ फोडून त्यांना बाहेर काढले. अद्याप ते सोनमर्गमध्येच असून खराब हवामानामुळे त्यांना तिथून बाहेर पडता आलेले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज