अ‍ॅपशहर

PM मोदींच्या निमंत्रणानंतर काश्मीरवर उद्या सर्वपक्षीय बैठक; राज्यात हाय अलर्ट जारी, इंटरनेट सेवा बंद

पंतप्रधान मोदींनी उद्या काश्मीरवर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. याबैठकीसाठी विविध पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राज्या ४८ तासांचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2021, 8:39 pm
नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणानंतर जम्मू-काश्मीरवर गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमधील गुपकार आघाडीतील सर्व पक्षांनी आणि काँग्रेसनेही बैठकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू - काश्मीरमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच २४ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi
PM मोदींच्या निमंत्रणानंतर काश्मीरवर उद्या सर्वपक्षीय बैठक; राज्यात हाय अलर्ट जारी, इंटरनेट सेवा बंद


राज्यात ऑगस्ट २०१९ पूर्वीची घटनात्मक स्थिती बहाल करणं आणि वेगवेगळ्या तुरुंगात कैद असलेले काश्मीरींना तात्काळ सोडण्याचा मागणी या बैठकीत केली जाणार आहे. तर भारत सरकारने पाकिस्तानसोबत पुन्हा चर्चेची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केलीय. या व्यतिरिक्त पीडीपी, माकप हे आपल्या पक्षांची भूमिकाही मांडतील. कारण सर्वांना वेगवेगळे निमंत्रण देण्यात आले आहे. मतभेद कायम राहिल्यास त्याचं खापर केंद्रावर फोडता येईल आणि मार्ग निघाला तर श्रेय घेता येईल, अशी यामागची रणनिती असल्याचं बोललं जातंय.

बैठकीत चर्चा काश्मीरी जनतेच्या हिताची असेल तर स्वीकारली जाईल, अन्य आम्ही प्रस्ताव फेटाळून लावू, असं पीडीपीचे नेते म्हणाले. जम्मू काश्मीर अपनी पार्टीचे प्रमुख सय्यद अल्ताफ बुखारीही २४ जूनच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

sharad pawar : काय आहे शरद पवारांची राजकीय खेळी? प्रशांत किशोर पुन्हा भेटले

गडकरींचा दौरा... मुख्यमंत्र्यांसमोर अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांना लाथ मारली

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना आणि पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता हे जम्मूहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्ला रवाना झाल्या आहेत.

महत्वाचे लेख