अ‍ॅपशहर

वडगाममधून जिग्नेश मेवाणी विजयी

गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी हे विजयी झाले आहेत. दलित हक्क कार्यकर्ते मेवाणी यांनी १८१५० मतांनी विजय मिळवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2017, 12:44 pm
अहमदाबाद :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alpesh thakor and jignesh mevani big congress hopes lead in gujarat
वडगाममधून जिग्नेश मेवाणी विजयी


गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी हे विजयी झाले आहेत. दलित हक्क कार्यकर्ते मेवाणी यांनी १८१५० मतांनी विजय मिळवला आहे.

वडगाम मतदारसंघात मेवाणी यांच्यासह एकूण दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र खरी लढत मेवाणी आणि भाजपचे चक्रवर्ती यांच्यातच होती. मेवाणींना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. मेवाणी वकील असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. उना गावात गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केल्यानंतर मेवाणीच्या नेतृत्वाखाली दलित अस्मिता यात्रा काढण्यात आली होती. त्यात २० हजार महिलांनी सहभाग घेतला होता. या मोर्चातूनच मेवाणींचा राजकीय उदय झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज