अ‍ॅपशहर

तरुणीवर अत्याचार; फलाहारीबाबाला अटक

एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू कौशलेंद्र प्रपन्नाचार्य फलाहारी महाराज ऊर्फ बाबाला (वय ६०) शनिवारी अलवर येथून अटक केली. गेल्या महिन्यात बाबाला भेटण्यासाठी आश्रमात गेली असता, बाबाने अत्याचार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे.

Maharashtra Times 24 Sep 2017, 3:18 am
वृत्तसंस्था, जयपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alwar based falahari baba accused of rape arrested
तरुणीवर अत्याचार; फलाहारीबाबाला अटक


एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू कौशलेंद्र प्रपन्नाचार्य फलाहारी महाराज ऊर्फ बाबाला (वय ६०) शनिवारी अलवर येथून अटक केली. गेल्या महिन्यात बाबाला भेटण्यासाठी आश्रमात गेली असता, बाबाने अत्याचार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी फलाहारी बाबाला अटक केली असून, अलवर येथील कोर्टात हजर केले असता, कोर्टाने बाबाला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

फलाहारी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानातील या महाराजाचे देशात आणि देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पीडित तरुणी ही मूळ छत्तीसगडमधील बिलासपूर येथील असून, तिचे कुटुंबीयही अनेक वर्षांपासून बाबांचे अनुयायी आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात आश्रमाला देणगी दिल्याचा दावाही कुटुंबीयांनी केली आहे.

पीडित तरुणी ही कायद्याचे शिक्षण घेत आहे. बाबाच्या शिफारशीमुळे दिल्लीतील एका ज्येष्ठ वकिलाकडे तिला इंटर्नशीप मिळाली होती. तिच्या कुटुंबीयांनी इंटर्नशीपपोटी तिला मिळालेले पहिले स्टायपेंड बाबाच्या आश्रमाला देण्यास सांगितले. त्यानुसार, ती गेल्या महिन्यात ७ ऑगस्ट रोजी, रक्षाबंधनाच्या दिवशी बाबाच्या अलवर येथील आश्रमात गेली होती. बाबाने तिला चंद्रग्रहण पाहण्यासाठी म्हणून त्या दिवशी तिथेच थांबायला सांगितले. त्यानुसार, ती तरुणी आश्रमात थांबली असता, बाबाने मध्यरात्रीच्या सुमारास तिला त्याच्या रूममध्ये बोलवून लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बलात्कारप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरुमित राम रहीमला अटक झाल्यानंतर मला बळ तक्रार करण्यास मिळाले. त्यानुसार, ११ सप्टेंबर रोजी बिलासपूर येथे तक्रार दाखल केली, असेही या तरुणीने म्हटले आहे. बिलासपूर येथे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस अलवर येथील आश्रमात पोचले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज