अ‍ॅपशहर

मृत्युशी झगडताना अमर सिंह यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट

समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह सध्या आजारपणामुळे कठिण परिस्थितीचा सामना करत आहेत. आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मंगळवारी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटद्वारे त्यांनी बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक भावूक ट्विट केलंय. या ट्विटद्वारे अमर सिंह यांनी बीग बी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2020, 3:42 pm
लखनऊ : समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह सध्या आजारपणामुळे कठिण परिस्थितीचा सामना करत आहेत. आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मंगळवारी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटद्वारे त्यांनी बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक भावूक ट्विट केलंय. या ट्विटद्वारे अमर सिंह यांनी बीग बी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमर सिंह - अमिताभ बच्चन


'आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं मला अमिताभ बच्चन यांच्याकडून एक मॅसेज मिळाला. आज आयुष्याच्या या वळणावर जेव्हा मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, मी अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आपल्या टिप्पणीसाठी माफी मागतो. ईश्वर त्यांचं भलं करो' असं ट्विट अमर सिंह यांनी केलंय.



'आजच्याच दिवशी माझे वडील स्वर्गवासी झाले होते. गेल्या दशकाभरापासून या तारखेला मला अमित बच्चन यांच्याकडून संदेश मिळतो. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये अधिक स्नेह असतो आणि त्यात काही कमी-अधिक अपेक्षा किंवा उपेक्षा होते, तेव्हा ते संबंध अधिक तीव्रतेने बिघडतात. संबंध जेवढे जवळचे असतात, तेवढेच ते संबंध तुटण्याचा त्रास जास्त होतो' असंही अमर सिंह यांनी म्हटलंय.

अमर सिंह यांचे बच्चन कुटुंबीयाशी संबंध का बिघडले?

काही वर्षांपूर्वी, महिलांविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांबद्दल जया बच्चन यांनी एक भाषण दिलं होतं. यावर पलटवार करताना अमर सिंह यांनी जया बच्चन यांना सुनावलं होतं. 'तुम्ही एक आई आहात, पत्नी आहात. आई-पत्नीच्या हातात सामाजिक रिमोट असतो. तुम्ही तुमच्या पतीला का नाही सांगत की जुम्मा चुम्मा दे दे करू नका. तुम्ही पतीला का सांगत नाहीत की, पावसात भिजणाऱ्या नायिकेसोबत आज रपट जइयो, हमे न भुलइयो करू नका... तुम्ही तुमच्या सुनेला ए दिल है मुश्किलमध्ये जी दृश्यं केलेत ते करू नको, असं का सांगत नाहीत. ज्या सिनेमांत नायिका जवळपास नग्न होते, असे दृश्यं करू नको असं तुम्ही तुमचा मुलगा अभिषेकला का सांगत नाहीत' असे तिखट आणि बोचरे सवाल विचारत अमर सिंह यांनी बच्चन कुटुंबीयांवर टीका केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज