अ‍ॅपशहर

amarinder singh : पंजाब काँग्रेसमध्ये बंड! अमरिंदर सिंग-अमित शहांच्या भेटीच्या चर्चेने दिल्लीत राजकीय भूकंप?

काँग्रेसमध्ये एकीकडे कन्हैय्या कुमार यांच्या प्रवेशावरून वादाला तोंड फुटलं आहे. दुसरीकडे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री आणि भापचे वरिष्ठ नेते अमित शहांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2021, 4:00 pm
नवी दिल्लीः पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपार्श्वभूमी राजकारण रंगलं आहे. काँग्रेस कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चरणजीत सिंग चन्नी यांची वर्णी लावली. चरणजीत सिंग चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने काँग्रेस हायकमांडवर नाराज असलेले माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे आज दिल्लीत दाखल होत आहेत. अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दशकांपासून गांधी घाराण्याशी एकनिष्ठ आणि विश्वासू असलेले अमरिंदर सिंग हे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चिन्ह आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amarinder singhs visit to delhi speculations that will meet amit shah
पंजाब काँग्रेसमध्ये बंड! अमरिंदर सिंग-अमित शहांच्या भेटीच्या चर्चेने दिल्लीत राजकीय भूकंप?


एकीकडे अमरिंदर सिंग हे अमित शहांची भेट घेणार असल्याची चर्चा असताना दुसरीकडे कन्हय्या कुमार यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशावरून वरिष्ठ नेते मनिष तिवारी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत त्यांनी 'कम्युनिस्ट इन काँग्रेस' या पुस्तकाचा दाखला देत कन्हय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशावर आक्षेप घेतला आहे.

अमरिंदर सिंग हे आज संध्याकाळी ४.३० वाजता दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. अमरिंदर सिंग हे अमित शहांची भेट घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय. अमरिंदर सिंग हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. अमित शहा आणि अमरिंदर सिंग यांच्या संभाव्य भेटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप मुख्यालयात हालचालींना वेग आला आहे.

अमरिंदर सिंग यांच्या दिल्ली भेटीबाबत वेगवगेळ्या चर्चा सुरू आहेत. पण ते वैयक्तीक दौऱ्यावर जात आहेत. आपल्या मित्रांच्या भेटी घेणार आहे. तसंच पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांसाठी ते कपूरथला हाऊस रिकामे करणार आहेत. यामुळे कुठलेही तर्कवितर्क लावू नका, असं अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठूकराल यांनी ट्विट करून स्पष्ट केलं आहे.

Kanhaiya Kumar: कन्हय्या कुमार यांची काँग्रेस एन्टी, मनिष तिवारींचा आपल्याच पक्षावर निशाणा

अमरिंदर सिंग यांना हटवून पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे निवकटवर्तीय चरणजीत सिंग चन्नी यांना काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री केलं. यानंतर अमरिंदर सिंग हे काँग्रेस हायकमांडवर आणि पक्षाच्या निर्णयावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका करत त्यांना अनुभव नसल्याचं म्हटलं होतं.

BREAKING: नवज्योत सिंह सिद्धूंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

गृहमंत्री अमित शहा आणि अमरिंदर सिंग यांच्यात यापूर्वीही भेट झाली आहे. पण मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने नाराज असलेल्या अमरिंदर सिंग यांच्या या संभाव्य भेटीने दिल्लीत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज