अ‍ॅपशहर

अमित शहांचा मोर्चा पूर्वेकडे; आसाम-मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

Amit Shah in Assam, Manipur : नुकताच पश्चिम बंगालला भेट देणारे गृह मंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या ईशान्य दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आसाम आणि मणिपूरला भेट देणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2020, 10:35 am
नवी दिल्ली : पश्चिम बंगालनंतर गृह मंत्री अमित शहा यांनी आपला मोर्चा ईशान्येकडील आसाम - मणिपूर या राज्यांकडे वळवलाय. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आजपासून आसाम आणि मणिपूरच्या दौन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amit shah in guwahati
अमित शहा ईशान्य दौऱ्यावर


शुक्रवारी रात्रीच अमित शहा गुवाहाटी इथं दाखल झालेत. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हजर झाले होते.


ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक हिमंता विश्व सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आसाम दौर्‍यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्य पक्ष कोअर कमिटी आणि बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्यांची भेट घेणार आहेत.

युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल - भाजपा - गण सुरक्षा पक्ष या आघाडीच्या २३ सदस्यीय प्रतिनिधीमंडळही यावेळी अमित शहांशी संवाद साधणार आहे, असंही सरमा यांनी स्पष्ट केलंय.

नितीश कुमारांना 'मित्र' भाजपकडून आणखीन एक जोरदार धक्का 'थलाईवा' रजनीकांत पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल
आसामच्या बाताद्रव भागात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळाच्या सुशोभीकरणासाठी पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्यालाही अमित शहा हजर राहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री शहा ८६० कोटी रुपये खर्च करून गुवाहाटी इथं उभारल्या जाणार्‍या देशातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं शिलान्यासही करणार आहेत, अशी माहितीही सरमा यांनी दिलीय.

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांशी राज्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

रविवारी सकाळी अमित शहा प्रसिद्ध कामाख्या मंदिरात प्रार्थना करतील. त्यानंतर ते मणिपूरकडे रवाना होतील. इथं ते विविध योजनांचं उद्घाटन करणार आहेत. रविवारी सायंकाळी अमित शहा दिल्लीकडे रवाना होतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज