अ‍ॅपशहर

अमृतसर दुर्घटना; 'जमावाचाच दोष'

दसरादिनी १९ ऑक्टोबरला रावणदहनप्रसंगी अमृतसर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेरुळांवर झालेल्या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी जमावालाच दोषी ठरवले आहे.

Maharashtra Times 23 Nov 2018, 4:00 am
नवी दिल्ली : दसरादिनी १९ ऑक्टोबरला रावणदहनप्रसंगी अमृतसर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेरुळांवर झालेल्या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी जमावालाच दोषी ठरवले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amritsar accident defect of mob
अमृतसर दुर्घटना; 'जमावाचाच दोष'


रुळांवर व रुळांच्या नजीक उभ्या असलेल्या जमावाच्या निष्काळजीमुळेच हा अपघात घडल्याचे आयुक्त एस. के. पाठक यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. '१०० किमी प्रतितास वेगाची मर्यादा असलेल्या या भागात रेल्वेगाडीचा वेग ८२ किमी प्रति तास होता. मात्र फटाक्यांच्या धुरामुळे व 'एस' आकाराच्या वळणामुळे केवळ २० मीटर आधीच चालकाला जमाव दिसला. तातडीने ब्रेक लावूनही रेल्वे ३८९ मीटर पुढे गेली', असे अहवालात म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज