अ‍ॅपशहर

सीएएविरोधी करोनासारखेः योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशातील सीएएविरोधी हिंसक आंदोलन करणाऱ्यांचे होर्डींग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने ठिकठिकाणी उभारले होते. यावरून योगी आदित्यनाथ सरकारला हायकोर्टाने फटकरालं. या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ यांनी सीएएविरोधक आणि हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर निशाणा साधलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 11:09 am
लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. आदित्यनाथ यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्यांची तुलना करोना व्हायरसशी केलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi-adityanath


करोना व्हायरस हा मानवतेचा शत्रू आहे. हा माणसातूनच पसरतोय. हा स्वार्थासाठी जाळपोळ आणि तोडफोड करून मानवी मूल्यांवर हल्ला करतोय. त्यांची अनैतिक कृत्य रोखली की ते दुसरा चेहरा घेऊन उभे ठाकतात. करोना आणि होर्डींगवर असलेल्या हिंसाचार करणाऱ्यांचे चेहरे हे दोन्ही समाजासाठी घातक आहेत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

मानवतेचे मोठे शत्रू

सीएएविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांचे होर्डींग हे उत्तर प्रदेशात लावण्यात आले होते. हे होर्डींग काढण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यावरून योगी आदित्यनाथ यांनी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना लक्ष्य केलं. होर्डींगवरील चेहरे बघा. स्वयंसेवी संस्था किंवा इतर संस्थेच्या नावाने मानवतेचे पाठ देणारे बघा काय करत आहेत. त्यांचं खरं काम बघितलं तर ते मानवतेचे सर्वांत मोठे शत्रू असल्याचं समोर येतं. जनतेने खऱ्या शत्रूंना ओळखण्याची गरज आहे. यामुळे अशा व्हायरसपासून बचाव करता येईल, असं आदित्यनाथ म्हणाले.

ताहीर हुसेन याला कोठडी

'सीएए'चा गोंधळ दूर करा

होर्डींग लावून कुणाची प्रतिमा मलिन झाली नाहीए. तर हिंसा करणारे हे चेहरे मीडियातून जनतेपर्यंत आधीच पोहोचले आहेत. त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाहीए. तेच समाजासाठी धोकादायक बनले आहेत. याचे ठोस पुरावेही आहेत. सीएएविरोधी हिंसाचारात पोलिसाच्या गोळीने कुणीच ठार झालं नाही. ते आपल्याच गोळीने ठार झाले, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज