अ‍ॅपशहर

अन् लष्कर प्रमुख शहीदाच्या पत्नीच्या पाया पडले

जाहीर समारंभात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत ८० वर्षांच्या रसुलन बीबी यांचे पाया पडले आणि उपस्थित सर्वांची मान अभिमानाने उंचावली. देशाच्या सर्वोच्च वीर पुरस्काराने गौरव झालेल्या शहीद अब्दुल हमीद यांची रसूलन बीबी या पत्नी आहेत.

Maharashtra Times 10 Sep 2017, 10:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । धामुपूर, गाझीपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम army chief general bipin rawat touches feet of 1965 martyrs widow
अन् लष्कर प्रमुख शहीदाच्या पत्नीच्या पाया पडले


जाहीर समारंभात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत ८० वर्षांच्या रसुलन बीबी यांचे पाया पडले आणि उपस्थित सर्वांची मान अभिमानाने उंचावली. रसूलन बीबी या देशाच्या सर्वोच्च वीर पुरस्काराने गौरव झालेल्या शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी आहेत.

शहीद अब्दुल हमीद यांच्या ५२व्या स्मृती निमित्त उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळगावी धामुपूरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रावत यांनी शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकाचे अनावरण केले. या कार्यक्रमात रावत यांनी ससूलन बीबी यांच्यासह परिसरातील इतर शहीद जवानांच्या विधवा पत्नींचाही सन्मान केला. या कार्यक्रमावेळी रावत यांची पत्नी मधुलिका रावत याही उपस्थित होत्या.



१९६५ युद्धात अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानी रणगाड्यांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. आपल्या वीर पराक्रमाने त्यांनी अनेक रणगाडे निकामी केले आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळवले. पण युद्धात लढता लढता अब्दुल हमीद यांना वीरमरण आले. युद्धातील अतुल्य परक्रमाबद्दल शहीद अब्दुल हमीद यांचा मरणोत्तर सर्वोच्च वीर पुरस्कार मानल्या जाणाऱ्या परमवीर चक्राने सन्मान करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज