अ‍ॅपशहर

काश्मिरी जवानाची हत्या

काश्मिरी युवकांमध्ये भय निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून दहशतवाद्यांनी शनिवारी आणखी एका काश्मिरी जवानाची हत्या केली. सुट्टीवर आपल्या घरी आलेल्या या जवानाचे अपहरण करून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा संशय लष्कराने वर्तवला आहे.

Maharashtra Times 26 Nov 2017, 1:42 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम army jawan on vacation kidnapped and killed by militants in kashmir
काश्मिरी जवानाची हत्या


काश्मिरी युवकांमध्ये भय निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून दहशतवाद्यांनी शनिवारी आणखी एका काश्मिरी जवानाची हत्या केली. सुट्टीवर आपल्या घरी आलेल्या या जवानाचे अपहरण करून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा संशय लष्कराने वर्तवला आहे.

लष्कराच्या टेरिटोरिअल विभागात शिपाई पदावर कार्यरत असलेला २३वर्षीय इरफान अहमद दार सुट्टीसाठी शोपियान येथील शेनझेन या आपल्या गावी आला होता. आज, रविवारी त्याच्या सुट्टीचा अखेरचा दिवस होता. मात्र शनिवारीच त्याचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शोपियानमधीलच वतमुल्लाह कीगम भागातील एका फळांच्या बागेत आढळला. बंदुकीच्या गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचे समोर आले. दहशतवाद्यांनीच त्याचे अपहरण करून हत्या केली असावी, असा कयास लष्कराने व्यक्त केला आहे.

९ मे, २०१७ : उमेर फयाज (२२) या लेफ्टनंट पदावरील जवानाची अपहरण करून हत्या. चुलत बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीवर आला असतानाच दहशतवाद्यांनी रात्री १०च्या सुमारास त्याचे अपहरण केले. २७ सप्टेंबर, २०१७ : रमजान पारे (३३) या सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबलची घरात शिरून हत्या. बंदिपोरा येथील घरी सुट्टीवर आलेला असतानाच दहशतवाद्यांनी त्याच्यासह कुटुंबीयांवरही गोळ्या झाडल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज