अ‍ॅपशहर

जवानांची पोलिसांना मारहाण, सातजण जखमी

जम्मू-काश्मीरच्या गांदेरबल जिल्हयातील एका चेक नाक्यावर लष्करातील जवान आणि पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत ७ पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जवानांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

Maharashtra Times 22 Jul 2017, 4:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम army personnel scrambles with policemen 7 injured
जवानांची पोलिसांना मारहाण, सातजण जखमी


जम्मू-काश्मीरच्या गांदेरबल जिल्हयातील एका चेक नाक्यावर लष्करातील जवान आणि पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत ७ पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जवानांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

लष्करातील हे जवान अमरनाथ यात्रेतील बालटाल आधार शिविरातून येत होते. खाजगी वाहनातून येणारे जवान साध्या वेषात होते. त्यामुळे पोलिसांनी सोनमर्ग चेक नाक्यावर या जवानांना तपासणीसाठी अडवले. पण त्यांची गाडी नाक्यावर थांबली नाही, गांदेरबलच्या दिशेने ते निघून गेले. त्यामुळे सोनमर्ग पोलिसांनी गुंड चेक नाक्यावरील पोलिसांना त्याबाबतची खबर दिली. गुंड चेक नाक्यावर जवानांची गाडी अडविण्यात आली. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर गाड्या सोडण्याची वेळही निघून गेली होती. त्यामुळे सुद्धा जवानांची गाडी अडविण्यात आली. गाडी पुढे जाऊ दिल्यास धोका उदभवू शकतो, असंही जवानांना सांगण्यात आलं. पण ते ऐकायला तयार नव्हते. या कारणावरून जवान आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर जवानांनी २४ राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या सदस्यांना बोलावून घेतले आणि या सर्वांनी मिळून पोलिसांना मारहाण केली. या हाणामारीत सहायक उपनिरीक्षकांसह सात पोलीस जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, जवान आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज