अ‍ॅपशहर

अरुण जेटली किडनीच्या विकाराने त्रस्त

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली किडनीच्या विकाराने त्रस्त असून लवकरच त्यांचे ऑपरेशन होणार आहे. त्यामुळे त्यांनी पुढील महिन्यातील लंडनचा दौराही रद्द केला आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे काही दिवस ते घरूनच त्यांच्या खात्याचं काम पाहणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2018, 10:02 pm
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली किडनीच्या विकाराने त्रस्त असून लवकरच त्यांचे ऑपरेशन होणार आहे. त्यामुळे त्यांनी पुढील महिन्यातील लंडनचा दौराही रद्द केला आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे काही दिवस ते घरूनच त्यांच्या खात्याचं काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arun jaitley unwell liver problem reported
अरुण जेटली किडनीच्या विकाराने त्रस्त


किडनीच्या विकार बळावला असला तरी अरुण जेटली यांना अद्याप रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्या-येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार पासून ते त्यांच्या कार्यालयातही जाऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे राज्यसभेवर त्यांची दुसऱ्यांदा निवड झालेली असतानाही प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी अद्यापपर्यंत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही. प्रकृती ठिक नसल्याने केवळ लंडनचा दौराच नव्हे तर त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्यांचे दोन कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले नव्हते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज