अ‍ॅपशहर

राज्यपाल मोदींसाठी हेरगिरी करताहेतः केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात पुन्हा एकदा वाक्-युद्ध जुंपण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारचे मंत्री आणि अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून राज्यपाल केंद्रातील मोदी सरकारसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

Maharashtra Times 7 Jun 2016, 6:31 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arvind kejriwal accuses lg najeeb jung of spying for pmo
राज्यपाल मोदींसाठी हेरगिरी करताहेतः केजरीवाल


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात पुन्हा एकदा वाक्-युद्ध जुंपण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारचे मंत्री आणि अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून राज्यपाल केंद्रातील मोदी सरकारसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

केंद्रीय गृहखात्याने दिल्ली सरकारला २४ मे रोजी एक पत्र पाठवलं होतं. सरकारने किती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली, सल्लागार म्हणून किती जणांना कॉन्ट्रॅक्टवर ठेवलंय, याबाबतची माहिती गृहखात्याने मागवली होती. हे पत्र नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या तक्रारीमुळेच आल्याचं दिल्ली सरकारला वाटतंय. कारण, जंग यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलं होतं. दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्याच्या नियुक्तीवर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावरूनच आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि जंग यांच्यात खटका उडाला आहे.

राज्यपाल राज्य सरकारच्या कामात अडथळे आणत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी पुन्हा केला आहे. तसंच, दिल्लीत महिलांवर बलात्कार होत असताना, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही काय केलंत?, असा सवालही त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना कोण भेटते यावर राज्यपाल पाळत ठेवत असून ही माहिती ते पंतप्रधान कार्यालयाला पाठवित आहेत, असं ट्विट करून केजरीवाल यांनी जंग यांना जाहीरपणे लक्ष्य केलंय. त्यावरून या दोघांमध्ये पुन्हा 'जंग' होण्याची चिन्हं आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज