अ‍ॅपशहर

arvind kejriwal : 'ठरवलं तर, काँग्रेसचे २५ आमदार संध्याकाळपर्यंत पक्षात येतील, पण त्यांचा कचरा नको'

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला सणसणीत टोला लगवला आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल हे पंजाबमध्ये आले होते. आपण ठरवलं तर काँग्रेसचे २५ आमदार पक्षात येतील, असे केजरीवाल म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2021, 6:43 pm
अमृतसरः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या अमृतसरमध्ये आज मोठ दावा केला. प्रवेश देणे सुरू केले तर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आपल्या पक्षात दाखल होतील. पण काँग्रेसचा कचरा आम्हाला घ्यायचा नाही, असा सणसणीत टोला केजरीवाल यांनी लगावला. आम्हाला त्यांच्यासारखे गलिच्छ राजकारण करायचे नाही, असेही मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arvind kejriwal slams congress and navjot singh sidhu
'ठरवलं तर, काँग्रेसचे २५ आमदार संध्याकाळपर्यंत पक्षात येतील, पण त्यांचा कचरा नको'


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अमृतसरमध्ये पत्रकार परिषद घेतली. प्रत्येक पक्षात असे घडते. ज्याला निवडणुकीचे तिकीट मिळत नाही तो रागावतो. त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जातात. काही लोक सहमत असतात तर काही लोक नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातात. काँग्रेसमधील असे बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत. पण काँग्रेसचा कचरा आम्हाला उचलायचा नाही, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

आम्ही त्यांचा कचरा उचलायला सुरवात केली तर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आमच्या पक्षात दाखल होतील, हे आपले आव्हान आहे. आमचे फक्त दोनच आमदार गेले आहोत. पण माझे आव्हान आहे. काँग्रेसचे २५ आमदार आणि २-३ खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना आम आदमी पार्टीत प्रवेश करायचा आहे, असा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला.

sambit patra : भाजप प्रवक्ते संबित पात्रा अडचणीत, दिल्लीतील कोर्टाने दिले FIR दाखल करण्याचे आदेश

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी शिक्षकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी राज्यातील शिक्षकांना कालबद्ध पदोन्नती आणि कॅशलेस वैद्यकीय सुविधा यासह ८ आश्वासने दिली. पंजाबमधील शिक्षकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. 'आप'चे सरकार आल्यावर सर्व शिक्षकांना कायम स्वरुपी केले जाईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.

tripura polls supreme court : 'भाजप आमदाराने 'तालिबान स्टाइल'मध्ये हिंसा करण्याचे भाषण दिले होते का?', सुप्रीम कोर्टाचा सवाल

महत्वाचे लेख