अ‍ॅपशहर

केजरीवाल विपश्यना करणार

लोकसभा निवडणुकीतील 'घनघोर' प्रचारानंतर मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा विपश्यनेला बसणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे होणाऱ्या विपश्यना शिबिरासाठी केजरीवाल यांनी १० दिवसांची रजा टाकली आहे. विशेष म्हणजे, राजकारणाच्या मैदानात मीडियाचा प्रभावी वापर करणारे केजरीवाल या दिवसांत वृत्तपत्र व टीव्हीपासून पूर्णपणे दूर राहणार आहेत.

Maharashtra Times 29 Jul 2016, 1:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arvind kejriwal to go for vipassana
केजरीवाल विपश्यना करणार

लोकसभा निवडणुकीतील 'घनघोर' प्रचारानंतर मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा विपश्यनेला बसणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे होणाऱ्या विपश्यना शिबिरासाठी केजरीवाल यांनी १० दिवसांची रजा टाकली आहे. विशेष म्हणजे, राजकारणाच्या मैदानात मीडियाचा प्रभावी वापर करणारे केजरीवाल या दिवसांत वृत्तपत्र व टीव्हीपासून पूर्णपणे दूर राहणार आहेत.

नागपूर येथील एका ध्यानधारणा केंद्रात शिबिरार्थी म्हणून ३० जुलै रोजी केजरीवाल अर्ज भरणार आहेत. आम आदमी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं ही माहिती दिली. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया हे दिल्ली सरकारची धुरा सांभाळणार आहेत.

खोकल्याच्या आजारानं बेजार असलेल्या केजरीवाल यांनी दोन वर्षांपूर्वी बेंगळुरू येथील एका संस्थेत नेचरोपथीचे उपचार घेतले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतरही केजरीवाल हे ध्यानधारणेसाठी गेले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज