अ‍ॅपशहर

आसाराम लोमटे यांना अकादमी पुरस्कार प्रदान

ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहासाठी २०१६ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कमानी सभागृहात 'साहित्य अकादमी २०१६' च्या पुरस्कार सोहळयाचे आज आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Times 23 Feb 2017, 12:22 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asaram lomate awarded by sahitya academy
आसाराम लोमटे यांना अकादमी पुरस्कार प्रदान


ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहासाठी २०१६ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कमानी सभागृहात 'साहित्य अकादमी २०१६' च्या पुरस्कार सोहळयाचे आज आयोजन करण्यात आले होते. शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवासराव तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मंचावर उपस्थित होते.

आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या ‘लघुकथा’ साहित्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. ‘आलोक’ या लघुकथेमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली मांडली आहे. ग्रामीण भागातील जीवनशैलीमध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या ‘आलोक’मध्ये प्रस्तुत केलेले आहे. यामध्ये गावातील लोकभाषा, स्थानिक परपंरा अतिशय अलगदपणे मांडली आहे. यासह ग्रामीण लोकांना येणाऱ्या जटीलतेविषयीही सांगण्यात आले आहे.

आसाराम लोमटे यांचा जन्म महाराष्ट्रातील गुगळी धमनगांव येथे झाला. मराठी साहित्यात त्यांनी डॉक्टरेट केले आहे. लोमटे यांचे ‘इडा पिडा टळो’, ‘आलोक’, ‘धूळपेर’ हे तीन लघुकथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या लिहिलेल्या कथा या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज