अ‍ॅपशहर

यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप दिग्विजयाच्या दिशेने

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर देशातील जास्तीत जास्त राज्ये पादाक्रांत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना उत्तर प्रदेशातील सुरुवातीच्या निकालांनी मोठं बळ मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ जागांपैकी भाजपला ३२२ जागांवर आघाडी मिळाली आहे. उत्तराखंडमध्येही भाजप एकहाती सत्तेच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे.

Maharashtra Times 11 Mar 2017, 5:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम assembly election results bjp heading toward majority in up uttarakhand
यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप दिग्विजयाच्या दिशेने


लोकसभा निवडणुकीतील यशानंतर देशातील जास्तीत जास्त राज्ये पादाक्रांत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना उत्तर प्रदेशातील सुरुवातीच्या निकालांनी मोठं बळ मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ जागांपैकी भाजपला ३२२ जागांवर आघाडी मिळाली आहे. उत्तराखंडमध्येही भाजप एकहाती सत्तेच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. केंद्राची सत्ता हाती असलेल्या भाजपच्या दृष्टीनं हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असून देशाच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारा ठरणार आहे.

पाच राज्यांपैकी यूपी, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या राज्यांत भाजपचाच वरचष्मा राहील, असा अंदाज मतचाचण्यांतून वर्तवण्यात आला होता. त्यापैकी मणिपूरचा अपवाद वगळता भाजपनं बाजी मारली आहे. काँग्रेसशी आघाडी करून भाजपला मात देण्याचा चंग बांधलेल्या अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाला मोठा फटका बसला आहे. आतापर्यंतच्या निकालांनुसार, समाजवादी व काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार जेमतेम ५८ जागांवर पुढं आहेत. तर, गेली दहा वर्षे सत्तेबाहेर असलेल्या मायावतींचा बहुजन समाज पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. बसप केवळ १८ जागांवर आघाडीवर आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज