अ‍ॅपशहर

आप उमेदवार आतिशी यांचे गौतमवर गंभीर आरोप

पूर्व दिल्लीच्या आपच्या लोकसभा उमेदवार आतिशी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर गंभीर यांनी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आतिशी यांचा आरोप आहे. ही टिप्पणी असलेलं पत्रक वाचताना आतिशी यांना रडू कोसळले. गंभीर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. जर मी काही चुकीचं केलंय हे सिद्ध झालं तर मी माझी उमेदवारी मागे घेईन, असं ट्विट त्यांनी केलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2019, 5:41 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atishi


पूर्व दिल्लीच्या आपच्या लोकसभा उमेदवार आतिशी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर गंभीर यांनी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आतिशी यांचा आरोप आहे. ही टिप्पणी असलेलं पत्रक वाचताना आतिशी यांना रडू कोसळले. गंभीर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. जर मी काही चुकीचं केलंय हे सिद्ध झालं तर मी माझी उमेदवारी मागे घेईन, असं ट्विट त्यांनी केलंय.

आतिशी यांनी एका पत्रकार परिषदेत गंभीर यांच्यावर हे आरोप केले आहेत. पत्रकारांसमोर पत्रक वाचताना त्यांना रडू कोसळले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेदेखील यावेळी उपस्थित होते. आतिशी म्हणाल्या, 'गंभीर राजकारणात आल्यावर मी त्यांचं स्वागत केलं होतं, पण आता भाजप खूपच खालच्या पातळीवर उतरला आहे.'

'लोक गौतम गंभीर यांना बघायला भलेही त्यांच्या सभांना गर्दी करत असले तरी मत त्यांना देणार नाहीत. कारण जनतेला त्यांच्यात राहणारा नेता हवा आहे,' असंही आतिशी यापूर्वी बोलल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज