अ‍ॅपशहर

'प्रभू रामचंद्रांना वाटेल तेव्हाच अयोध्येत मंदिर'

अयोध्येत लवकरात लवकर भव्य राम मंदिर उभारावं, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्रही असताना, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी मात्र राम मंदिराबाबत थोडी वेगळी भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2018, 6:11 pm
बहराइच (उत्तर प्रदेश):
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ayodhya temple will be built when ram wants it says dinesh sharma
'प्रभू रामचंद्रांना वाटेल तेव्हाच अयोध्येत मंदिर'


अयोध्येत लवकरात लवकर भव्य राम मंदिर उभारावं, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्रही असताना, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी मात्र राम मंदिराबाबत थोडी वेगळी भूमिका मांडली आहे. भगवान श्री रामचंद्रांच्या मनात असेल, त्यांची इच्छा होईल तेव्हाच अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू होईल, असं ते म्हणाले. बहराइचमधील एका कार्यक्रमात शर्मा बोलत होते.

भाजपनं राम मंदिराबाबतची भूमिका संकल्प पत्रात मांडली आहे. प्रत्येक काम हे ईश्वराच्या माध्यमातूनच होत असतं, असंही दिनेश शर्मा म्हणाले. प्रभू रामचंद्रांना जितक्या लवकर वाटेल, तितक्या लवकर मंदिराचं काम सुरू होईल. रामांची इच्छा होईल, त्यावेळी मंदिर उभारण्यास ते निमित्त ठरतील. आपला देश हा श्रद्धा आणि धर्मावर आधारित आहे. त्यामुळं आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळते, असंही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज