अ‍ॅपशहर

अयोध्या: 'पुनर्विचार याचिकेमुळे मुस्लिमांचं नुकसानच होईल'

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेला मुस्लिम कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. या पुनर्विचार याचिकेमुळे मुसलमानांना काहीही फायदा होणार नाही, उलट त्यांचं नुकसानच होईल, असं या विचारवंत, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2019, 4:23 pm
नवी दिल्ली: अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेला मुस्लिम कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. या पुनर्विचार याचिकेमुळे मुसलमानांना काहीही फायदा होणार नाही, उलट त्यांचं नुकसानच होईल, असं या विचारवंत, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ayodhya


देशभरातील १०० मुस्लिम विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलावंत, सिने निर्माते, रंगकर्मी, संगीतकार, विद्यार्थी, शेतकऱ्यांनी एक निवेदन जारी करून अयोध्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल तीव्र विरोध केला आहे. अयोध्या जमीन विवादप्रकरणी श्रद्धेपेक्षा कायदा महत्त्वाचा मानून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निकालात अनेक त्रुटी आहेत, हे माहित असूनही अयोध्या वाद जीवंत राहणं योग्य नाही, असं आम्हाला वाटतं. हा वाद जीवंत राहिल्यास त्याचं मुसलमानांनाच नुकसाना होईल. भारतीय मुस्लिमांना त्याचा काहीच फायदा होणार नाही, असं या निवेदनात म्हटलं आहे.

गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातून आपण काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार करून हा वाद संपुष्टात आणायला हवा. या वादात मुस्लिम समाजाची झालेली जीवीत हानी, संपत्तीचं झालेलं नुकसान आणि संघ परिवाराला आलेलं राजकीय यश या गोष्टींसह धार्मिक वादात गरीब मुसलमानांना मोजावी लागणारी किंमत या सर्व कटु अनुभवातून आपण काही शिकणार आहोत की नाही? असा सवालही या विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं.

अनेकांनी मुस्लिमांना हे प्रकरण पुढे नेण्याचा सल्ला दिला. पण आम्ही या प्रकरणातून मागे हटण्याचा सल्ला देत आहोत. मंदिर-मशीद वाद हा संघ परिवाराचा छुपा अजेंडा आहे. त्यांना या लोकशाही राष्ट्राचं हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, त्यामुळे ही पुनर्विचार याचिका मुस्लिमांच्या भल्याची राहणार नसल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. कोर्टात हे प्रकरण कोर्टात सुरू राहिल्यास मुस्लिम विरोधी प्रचाराला उत्तेजन मिळेल. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढेल, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

अयोध्या: सुन्नी वक्फ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

या निवेदनावर अभिनेते नसीरुद्दीन शहा, शबाना आझमी, सिने निर्मात्या शमा झैदी, समाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला, गुलाम वाहनवटी, आरिज मोहम्मद, नसरीन काँट्रॅक्टर, वकील ए. जे. जवाद, स्तंभलेखक अब्दूल कादर मुकादम, पत्रकार अफताब खान, निसार अहमद खान, वकील सना देशमुख, सोलापूर शेतकरी अकबर शेख, सिने लेखक अंजूम राजाबली, मानवाधिकार कार्यकर्ते जावेद आनंद, कवी हसन कमाल आदींसह शंभर जणांनी सह्या केल्या आहेत.

अयोध्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल ...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज