अ‍ॅपशहर

बाबा रामपाल निर्दोष, पण मुक्काम तुरूंगातच

सतलोक आश्रमाचे संचालक बाबा रामपालला दोन प्रकरणात निर्दोष ठरवण्यात आलं आहे. त्यामुळं बाबाला दिलासा मिळाला असला तरी देशद्रोह आणि खुनाचा खटला सुरू असल्यानं बाबाचा मुक्काम तुरूंगाताच राहणार आहे.

Maharashtra Times 29 Aug 2017, 4:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । हिसार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम baba rampal has been acquitted in the two cases
बाबा रामपाल निर्दोष, पण मुक्काम तुरूंगातच


सतलोक आश्रमाचे संचालक बाबा रामपालला दोन प्रकरणात निर्दोष ठरवण्यात आलं आहे. त्यामुळं बाबाला दिलासा मिळाला असला तरी देशद्रोह आणि खुनाचा खटला सुरू असल्यानं बाबाचा मुक्काम तुरूंगाताच राहणार आहे.

न्यायादंडाधिकारी मुकेश कुमार यांनी हा निकाल दिला. २०१४ मधील ही प्रकरणे असून रामपाल सहीत ११ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणण्याचा आणि आश्रमात महिलांना डांबून ठेवण्याचा रामपालवर आरोप होता. पण या प्रकरणात त्याला निर्दोष सोडण्यात आलं आहे. हिसारच्या मध्यवर्ती कारागृहातील एका विशेष न्यायालयात ही सुनावणी करण्यात आली.

हिसार मध्यवर्ती कारागृहात सुनावणी सुरू

रामपाल विरोधात देशद्रोहाच्या अर्धा डझन केसेस असून हत्येचेही त्याच्यावर आरोप आहेत. त्याला सध्या हिसार मध्यवर्ती कारागृह-२ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यावरील सुनावणीसाठी मध्यवर्ती कारागृह-१ मध्ये विशेष न्यायालय निर्माण करण्यात होतं.

हिसार तेंव्हाही पेटलं होतं

राम रहीमला अटक झाल्यानंतर हिसारमध्ये ज्याप्रकारे हिंसा झाली, तशीच हिंसा नोव्हेंबर २०१४ मध्ये झाली होती. रामपालला न्यायालयात हजर करत असताना असा हिंसाचार झाला होता. आश्रमच्या जमीनीवरून झालेल्या वादामुळे रामपालला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण साधकांच्या संरक्षणात रामपाल आश्रमात बसून राहिला होता. आश्रमातील ब्लॅक कॅट कमांडोंनी पोलीस आणि सुरक्षा दलाला खुलं आव्हान दिलं होतं. त्यामुळे झालेल्या संघर्षात शेकडो लोक जखमी झाले होते. तर ६ महिलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या महिलांच्या मृत्यूला रामपाल आणि त्यांच्या अनुयायांना जबाबदार धरण्यात आलं होतं. याप्रकरणी रामपाल सहीत त्याच्या ९३९ समर्थकांविरोधात खटला सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज