अ‍ॅपशहर

२०२३ मध्ये पृथ्वी बदलणार चाल, गंभीर असतील परिणाम; आतापर्यंतची सर्वात मोठी भविष्यवाणी

Baba Venga Prediction for 2023 : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, २०२३ मध्ये सर्वात मोठी खगोलीय घटना घडू शकते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे पृथ्वीची कक्षा बदलू शकते.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2022, 1:47 pm

पृथ्वीनं जगाचं टेन्शन वाढवलं; शास्त्रज्ञांनाही उत्तर मिळेना, पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम


Earth Orbit Change Baba Vanga Prediction : बल्गेरियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या (Baba Vanga's Predictions) अनेकदा चर्चेत असतात. मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी २०२३ या वर्षासाठी अनेक महत्त्वाच्या भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी पृथ्वीची कक्षा (Earth's Orbit) बदलणार असल्याचे सांगितले होते. बाबा वेंगा यांनी १११ वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक खरे ठरल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम baba vanga predictions list


२०२३ मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल...

बाबा वेंगाच्या अंदाजानुसार, पृथ्वीची कक्षा पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये बदलेल. बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये सर्वात मोठ्या खगोलीय घटनेची भविष्यवाणी केली होती आणि सांगितले होते की त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या घटनेत पृथ्वीची कक्षा बदलू शकते. याशिवाय पृथ्वीवर इतरही अनेक बदलांची शक्यता आहे.



५०७९ मध्ये जगाचा अंत होईल : बाबा वेंगा

बाबा वेंगांच्या अंदाजानुसार, अंतराळवीर २०२८ मध्ये शुक्रावर पोहोचू शकतात. इतकंच नाहीतर २०४६ मध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने लोक १०० वर्षांहून अधिक जगू शकतील. बाबा वेंगा यांनीही जगाच्या अंताची भविष्यवाणी केली होती आणि ५०७९ साली जगाचा अंत होईल असे सांगितले होते.

एसटी महामंडळाकडून सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, बसमध्ये बसण्याआधी नक्की वाचा ही बातमी...
या वर्षी भारतात येऊ शकते उपासमारीची वेळ...

द सनच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी १११ वर्षांपूर्वी २०२२ मध्ये भारतात उपासमारीची भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी जगभरातील तापमानात घट होईल आणि त्याचा परिणाम भारतावरही दिसून येईल. कमी तापमानामुळे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव वाढेल. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पीक निकामी झाल्यामुळे परिस्थिती अत्यंत वाईट होऊ शकते आणि उपासमारीची परिस्थिती उद्भवू शकते, असंही त्यांनी म्हटलं होतं.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज