अ‍ॅपशहर

चमत्कार...जन्माला येताच बाळ चालू लागलं!

आजच्या इंटरनेटच्या, स्मार्टफोनच्या युगात जन्माला येणारी पिढी प्रचंड 'स्मार्ट' आणि 'सुपरफास्ट' आहे, हे आपण सगळेच पाहतोय. ज्या वेगानं ही मुलं प्रत्येक गोष्ट आत्मसात करतात, हे पाहून थक्क व्हायला होतं. पण, एका बाळानं तर कमालच केलीय.

Maharashtra Times 29 May 2017, 12:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम baby starts walking immediately after being born
चमत्कार...जन्माला येताच बाळ चालू लागलं!


आजच्या इंटरनेटच्या, स्मार्टफोनच्या युगात जन्माला येणारी पिढी प्रचंड 'स्मार्ट' आणि 'सुपरफास्ट' आहे, हे आपण सगळेच पाहतोय. ज्या वेगानं ही मुलं प्रत्येक गोष्ट आत्मसात करतात, हे पाहून थक्क व्हायला होतं. पण, एका बाळानं तर कमालच केलीय. ते जन्माला येताच चालू लागलंय. बाळाच्या या 'चाली-चाली'चा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगानं 'व्हायरल' होतोय.

सर्वसाधारणपणे बाळाचा शारीरिक विकास हा मान सावरण्यापासून सुरू होतो. त्यानंतर, हळूहळू पालथं पडणं, रांगणं, आधाराने उभं राहणं, एकेक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणं अशी त्यांची प्रगती होत जाते. म्हणजेच, साधारण नऊ ते १२ महिन्यांमध्ये ते चालू लागतं.

पण फेसबुकवर २६ मे रोजी अपलोड झालेल्या व्हिडिओतील बाळ जन्माला येताच पावलं टाकताना दिसतंय. डॉक्टरांनी त्याला आधार दिलाय, पण बाळ ज्या ताकदीनं, आत्मविश्वासानं पाऊल पुढे टाकतंय, ते अविश्वसनीयच आहे. चमत्कार म्हणूनच त्याकडे पाहिलं जातंय. म्हणूनच, दोन दिवसांत हा व्हिडिओ ७ कोटींहून अधिक नेटिझन्सनी अगदी टक लावून, आ वासून पाहिलाय आणि लाखो जणांनी तो शेअरही केलाय.

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे बाळ कोण आहे, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. त्याचा शोध लवकरच लागेल, पण या 'धाकड' बाळाचा पराक्रम तोंडात बोटं घालायला लावणाराच आहे.



व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज