अ‍ॅपशहर

लस घेतलेल्यांसाठी वाईट बातमी! करोनाचा हा नवा व्हेरिएंट अतिशय धोकादायक, WHOकडून अलर्ट जारी

corona xbb 1.5 Variant India : करोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता कुठे देशात सर्व काही सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. अशाता आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. हा नवा व्हेरिएंट सगळ्यात धोकादायक असून यामुळे लसीकरण घेतलेल्या नागरिकांनाही धोका असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2023, 5:10 pm
नवी दिल्ली : जगभरात करोनाचा धोका टळला असला तरी करोनाचे नवनवीन प्रकार पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहेत. जगभरामध्ये करोनाच्या नवीन प्रकारामुळे सध्या भितीचं वातावरण आहे. आतापर्यंत करोनाच्या आलेल्या व्हेरिएंटपैकी नवीन व्हेरिएंट हा सगळ्यात धोकादायक असून या इतर प्रकरणांपेक्षा लसीकरण केलेल्या लोकांवर आणि करोनाची लागण झालेल्या लोकांसाठी धोक्याचा असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus new variant name


एका नव्या संशोधनांमध्ये हा दावा करण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने अलीकडेच याबाबत माहिती दिली आहे. यानुसार ३८ देशांमध्ये XBB.1.5 प्रकाराचे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये अमेरिकेमध्ये ८२ टक्के रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ब्रिटनमध्ये ८ टक्के आणि डेन्मार्कमध्ये २ टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. अभ्यासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या नव्या व्हेरिएंटचा लसीकरण झालेल्या लोकांनाही मोठ्या प्रमाणात धोका आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

'बायकोला सांगण्याची हिंमत झाली नाही', पतीने अनेक महिने लपवून ठेवलं आयुष्यातलं मोठं रहस्य
इतकंच नाहीतर ज्या लोकांना आधी करोनाचा संसर्ग झाला होता त्यांनादेखील पुन्हा धोका असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, ओमिक्रॉन पेक्षाही हा व्हेरिएंट धोकादायक असून याचा फैलावही वेगाने होत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरणाचे आवाहन करण्यात येत असून या संसर्गाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, भारतातही या जीवघेण्या संसर्गाची एकूण २६ प्रकरणं आढळली आहे. यामध्ये तीन दिवसांपूर्वी INSACOG ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत या संसर्गाची एकूण २६ प्रकरणं समोर आली असून आतापर्यंत ११ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा संसर्ग सापडला आहे. ज्यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचाही समावेश आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख