अ‍ॅपशहर

बलिया हत्याकांड : भाजप आमदाराला 'कारणे दाखवा' नोटीस

Ballia Murder Case : उत्तर प्रदेशातील बलिया हत्याकांडा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांना पक्षाकडून चांगलाच दट्ट्या मिळालाय. सुरेंद्र सिंह यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2020, 11:13 am
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बलियामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हत्याकांडानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंह याची पाठराखण करण्यावरून सुरेंद्र सिंह यांनी पक्षालाच अडचणीत आणलंय. त्यानंतर मात्र, भाजपनं आपल्या आमदाराला 'कारणे दाखवा' नोटीस धाडलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. नड्डा यांनी यावेळी भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांच्या वक्तव्यांबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भाजप आमदार सुरेंद्र सिंह​
भाजप आमदार सुरेंद्र सिंह (फाईल फोटो)


यानंतर नड्डा यांनी स्वतंत्र देव सिंह यांना आमदार सुरेंद्र सिंह यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्याचे आदेश दिले. बलिया हत्याकांडाच्या चौकशीत आमदारांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याची सक्त ताकीद देण्यासही सांगण्यात आलंय. अन्यथा पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आमदारांना देण्यात आलाय.


संबंधित बातम्या :
वाचा : मरण्या-मारण्याशिवाय आरोपीकडे पर्याय नव्हता : भाजप आमदार
वाचा : मुलींवर संस्कार नसल्यानंच बलात्कार, भाजप आमदाराची मुक्ताफळंवाचा : राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे; भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांचा हल्लाबोल

मुख्य आरोपीला अटक

दरम्यान, बलिया जिल्ह्यातील रेवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारातील प्रमुख सूत्रधारास उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी अटक केली. धीरेंद्र प्रताप सिंह असं या मुख्य आरोपीचं नाव असून, तो भारतीय जनता पक्षाचा स्थानिक नेता आहे. त्याच्यासह अन्य दोघांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या तिघांवर ५० हजार रुपयांचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं. याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण आठ जणांना अटक झाली आहे.

रेशन दुकानांच्या सरकारी वाटपादरम्यान ही घटना घडली होती. आरोपींनी केलेल्या गोळीबारात जयप्रकाश पाल गामा या ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या वाटप कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकारी व उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपींनी गोळीबार केल्यानं उत्तर प्रदेश सरकारवर टीका होत होती. पोलिसांच्या विशेष कृती पथकाने धीरेंद्रप्रतापला लखनऊ येथून, तर त्याच्या दोन साथीदारांना बलिया इथून अटक केली. या पथकाचे अधिकारी अमिताभ यश यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

आरोपींची मालमत्ता जप्त होणार

या सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलंय. न्यायालयासमोर त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. तसंच, त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आझमगड क्षेत्राचे पोलीस उपमहासंचालक सुभाषचंद्र दुबे यांनी दिली. गँगस्टर कायद्याच्या आधारे या आरोपींची मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :
वाचा : आसाम-मिझोरामच्या सीमेवर हिंसाचार, केंद्रानं बोलावली बैठक
वाचा : गायीच्या शेणापासून बनवलेल्या चिपने रेडिएशन कमी होते का?; वैज्ञानिकांनी मागितले पुरावे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज