अ‍ॅपशहर

मंत्र्यांचा प्रिय 'लाल दिवा' होणार इतिहासजमा!

जो लाल दिवा मिळवण्यासाठी नेतेमंडळी झटायची - झगडायची, तो प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जाणारा लाल दिवा आता इतिहासजमा होणार आहे. जनसामान्यांसाठी तापदायक ठरणाऱ्या 'व्हीआयपी कल्चर'ला चाप बसवण्यासाठी लाल दिवा हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला.

Maharashtra Times 19 Apr 2017, 2:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ban on red beacons for central ministers and officers by cabinet approval
मंत्र्यांचा प्रिय 'लाल दिवा' होणार इतिहासजमा!

जो लाल दिवा मिळवण्यासाठी नेतेमंडळी झटायची - झगडायची, तो प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जाणारा लाल दिवा आता इतिहासजमा होणार आहे. जनसामान्यांसाठी तापदायक ठरणाऱ्या 'व्हीआयपी कल्चर'ला चाप बसवण्यासाठी लाल दिवा हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला.

येत्या १ मे पासून - अर्थात कामगार दिनापासून राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशभरातील मंत्री किंवा अधिकारी गाड्यांवर लाल दिवा लावू शकणार नाही. अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवांना निळा दिवा वापरता येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या निर्णयानंतर लगेचच आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला आहे.

लाल दिव्याचा वापर सीमित करण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय गेल्या दीड वर्षांपासून विचार करत होतं. कॅबिनेट सचिवांसह अनेक बड्या अधिकाऱ्यांशी पीएमओनं चर्चाही केली होती. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयानंही ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून पीएमओला काही पर्याय सुचवले होते. सरसकट सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे लाल दिवे काढून घेतले जावेत किंवा फक्त पाच घटनात्मक पदांनाच लाल दिव्याची गाडी द्यावी, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यापैकी पहिला पर्याय स्वीकारून लाल दिवा पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय आज मोदी सरकारने घेतला. लाल दिव्यांच्या वापराबाबतची १०८ क्रमांकाची तरतूद आता काढून टाकली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज