अ‍ॅपशहर

वाहतूक कोंडीत अडकली कार; डॉक्टर ४५ मिनिटं धावले; सर्जरी करून रुग्णाला जीवनदान

रुग्णासाठी डॉक्टर देव असतात. डॉक्टर रुग्णांसाठी सदैव झटतात, रात्रीचा दिवस करतात. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरांनी पळत पळत रुग्णालय गाठलं. गोविंद नंदकुमार असं या डॉक्टराचं नाव आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2022, 5:24 pm
बंगळुरू: रुग्णासाठी डॉक्टर देव असतात. डॉक्टर रुग्णांसाठी सदैव झटतात, रात्रीचा दिवस करतात. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरांनी पळत पळत रुग्णालय गाठलं. गोविंद नंदकुमार असं या डॉक्टराचं नाव आहे. ३० ऑगस्टला नंदकुमार मणिपाल रुग्णालयात जात होते. त्यावेळी रस्त्यात मोठी वाहतूककोंडी होती. वाहतूककोंडी फुटण्याची वाट पाहत राहिल्यास शस्त्रक्रियेला उशीर होणार याची त्यांना कल्पना आली. त्यामुळे त्यांनी धावत धावत रुग्णालय गाठण्याचं ठरवलं आणि ते पळत सुटले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम doctor ran 3 km


एका रुग्णाच्या पित्ताशयाच्या पिशवीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी नंदकुमार मणिपाल रुग्णालयात जात होते. सरजापूर-मराठाहल्ली परिसरात ते वाहतूककोंडीत अडकले. शस्त्रक्रियेची वेळ जवळ आल्यानं आणि वाहतूककोंडी फुटण्याची शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी कार तिथेच ठेवून धावण्यास सुरुवात केली. कारमधून बाहेर पडून त्यांनी ३ किलोमीटरवर असणारं रुग्णालय गाठलं. त्यासाठी त्यांना ४५ मिनिटं लागली.
विसर्जनाला गालबोट; मुलगा डीजे लावलेल्या वाहनाखाली आला; जिवाच्या आकांतानं आक्रोश; पण...
मला कनिंघम रस्त्यावरून सरजापूरमधील मणिपाल रुग्णालय गाठायचं होतं. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं काही किलोमीटर परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. वाहतूक सुरळीत होण्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्यानं मी कारमधून बाहेर पडलो आणि जवळपास ४५ मिनिटं धावून रुग्णालयात पोहोचलो, असं नंदकुमार यांनी सांगितलं. वाहतूककोंडी फुटेपर्यंत वाट पाहणं मला शक्य नव्हतं. कारण माझ्या रुग्णांना शस्त्रक्रिया होईपर्यंत काहीही खाता येत नाही. त्यामुळे मी त्यांना जास्त वेळ प्रतीक्षा करत ठेऊ शकत नव्हतो, असंही ते पुढे म्हणाले.
कोणीच मदत करणार नाही! आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेवून ६० वर्षांच्या लेकानं गाठलं स्मशान
डॉ. गोविंद नंदकुमार गेल्या १८ वर्षांपासून मणिपाल रुग्णालयात गैस्ट्रोएंटरोलॉजी सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत १ हजारहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पचनसंस्थेशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात नंदकुमार अतिशय निपुण आहेत.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज