अ‍ॅपशहर

प्रमोशन नाकारले; CCDच्या मॅनेजरची आत्महत्या

प्रमोशन नाकारल्याने एका सीसीडी आऊटलेटच्या मॅनेजरने आत्महत्या केली. बेंगळुरूतील चिक्कमंगळुरू येथील कॅफे कॉफी डे मध्ये प्रमोद (३५) व्यवस्थापक म्हणून काम करत होता. आत्महत्येपू्र्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आपल्या मृत्यूसाठी कंपनीला जबाबदार धरले आहे.

Maharashtra Times 27 Jul 2017, 3:28 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bengaluru ccd manager denied promotion hangs himself blames company in a suicide note
प्रमोशन नाकारले; CCDच्या मॅनेजरची आत्महत्या


प्रमोशन नाकारल्याने एका सीसीडी आऊटलेटच्या मॅनेजरने आत्महत्या केली. बेंगळुरूतील चिक्कमंगळुरू येथील कॅफे कॉफी डे मध्ये प्रमोद (३५) व्यवस्थापक म्हणून काम करत होते. आत्महत्येपू्र्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कंपनीला जबाबदार धरले आहे.

महादेवपुरा येथे फिनिक्स मॉलमध्ये असलेल्या सीसीडीत प्रमोद काम करत होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मूल आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमोदने त्यांच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलंय की त्यांची बदली होऊन ते सध्या काम करत असलेल्या सीसीडीत आले होते. बदलीच्या वेळी त्यांना बढतीचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण बढती देण्याऐवजी त्यांना 'सेल्स टारगेट'देण्यात आले आणि पगार रोखण्याची धमकीही देण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांचा ताण वाढवणारी 'सेल्स डे' योजना बंद करण्याची मागणीही त्यांनी सुसाइट नोटमध्ये केली आहे. आपल्या पत्नी आणि मुलाला आर्थिक मदत करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज