अ‍ॅपशहर

'ही' आहेत जगातील सर्वात समृद्ध शहरं, मुंबई तळाला

जागतिक सर्वसमावेशक समृद्धी सूचीमध्ये तीन भारतीय शहरांचा समावेश झाला आहे. बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली या तीन शहरांना या यादीत स्थान मिळालं. समावेशक समृद्धीच्या बाबतीत विविध निकषांनुसार जगातील ११३ शहरांना स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान, याच यादीत भारतातील तीन शहरं सर्वात तळाला आहेत. सर्वसमावेशक समृद्धीचं आकलन करण्यासाठी केवळ आर्थिक विकासच नव्हे, तर लोकसंख्येचाही आधार घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2019, 7:14 am
नवी दिल्ली : जागतिक सर्वसमावेशक समृद्धी सूचीमध्ये तीन भारतीय शहरांचा समावेश झाला आहे. बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली या तीन शहरांना या यादीत स्थान मिळालं. समावेशक समृद्धीच्या बाबतीत विविध निकषांनुसार जगातील ११३ शहरांना स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान, याच यादीत भारतातील तीन शहरं सर्वात तळाला आहेत. सर्वसमावेशक समृद्धीचं आकलन करण्यासाठी केवळ आर्थिक विकासच नव्हे, तर लोकसंख्येचाही आधार घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prosperity index


बास्क इंस्टिट्यूशन्सच्या वतीने डीअँडएल पार्टनर्सने प्रॉस्पॅरिटी अँड इनक्लुजन सिटी सील अँड अवॉर्ड्स इंडेक्स तयार केला आहे. या यादीत बंगळुरू ८३, दिल्ली १०१ आणि मुंबई १०७ व्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात समृद्ध शहर ज्युरिच (स्वित्झर्लंड) आहे. त्यानंतर अनुक्रमे व्हिएन्ना आणि कोपनहेगनचा दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो.

भारतीय शहरांची स्थिती

भारतीय शहरयादीतील क्रमांक
बंगळुरू८३
दिल्ली १०१
मुंबई१०७

सर्वसमावेशक समृद्धीच्या बाबतीत यादीतील वरच्या दहा शहरात लक्झमबर्ग चौथ्या, हेलसिंकी पाचव्या, तैपेई सहाव्या, ओस्लो सातव्या, ओटावा आठव्या, कील नवव्या आणि जिनेव्हा दहाव्या क्रमांकावर आहे. आर्थिक यशाचं आकलन करण्यासाठी समृद्धीचे पारंपरिक उपाय हे मानक असू शकत नाही, असाही निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आला. त्यामुळेच जगातील सर्वात श्रीमंत शहरांचाही समृद्धीच्या बाबतीत वरचा क्रमांक लागलेला नाही.

जगातील समृद्ध १० शहरं

शहरयादीतील क्रमांक
ज्युरिच
व्हिएन्ना
कोपेनहेगन
लक्झमबर्ग
हेलसिंकी
तैपेई
ओस्लो
ओटावा
कील
जिनेव्हा१०

श्रीमंत शहरांमध्ये लंडन ३३ आणि न्यूयॉर्क ३८ व्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सच्या २०१९ च्या यादीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत १० शहरात मुंबईचाही क्रमांक लागतो. आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक शहरं या यादीत खालच्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या शहरांसमोर गरीबी आणि असमानता हे सर्वात मोठं आव्हान असल्याचंही स्पष्ट होतं.

स्वित्झर्लंडच्या शिक्षण प्रणालीने ज्युरिचला अव्वल स्थानावर आणलं आहे. कारण, जीवनमानाचा दर्जा, काम, राहण्यासाठी घरे, आरामदायी वेळ, सुरक्षा आणि शिक्षण या क्षेत्रात ज्युरिचची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाने आरोग्य क्षेत्रात सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज