अ‍ॅपशहर

'आप' खासदाराला सभापतींनी लोकसभेतच झापलं!

संसद भवन परिसरात व्हिडिओ शूट केल्यानंतर तो फेसबुकवर टाकणारे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी सभागृहातच झापलं. हे प्रकरण खूपच गंभीर असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे, असंही महाजन म्हणाल्या.

Maharashtra Times 22 Jul 2016, 1:39 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhagwant mann appears before loksabha speaker over parliament
'आप' खासदाराला सभापतींनी लोकसभेतच झापलं!


संसद भवन परिसरात व्हिडिओ शूट केल्यानंतर तो फेसबुकवर टाकणारे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी सभागृहातच झापलं. हे प्रकरण खूपच गंभीर असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे, असंही महाजन म्हणाल्या.

संसदेच्या सुरक्षेसाठी यापूर्वी १३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळं हे प्रकरण खूपच गंभीर आहे. त्याची दखल नक्कीच घेतली जाईल, असं महाजन यांनी सांगितलं. अशा प्रकारे व्हिडिओ शुटींग करून संसदेच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती सार्वजनिक केल्यासारखंच आहे. यामुळं दहशतवाद्यांना मदतच मिळू शकते, असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. शिरोमणी अकाली दलानेही मान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संसद परिसराच्या व्हिडिओवरून लोकसभेत शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. त्यामुळं लोकसभेचे कामकाज आधी दुपारी १२ पर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं. या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटले. त्यामुळे राज्यसभेचे कामकाजही स्थगित करण्यात आले. अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. जेडीयूचे खासदार शरद यादव यांनी मान यांचे समर्थन केले. संसद भवन परिसरात व्हिडिओ शुटींग करणं हा मान यांचा पोरकटपणा आहे, असं ते म्हणाले. सीताराम येच्युरी यांनी सरकारलाच धारेवर धरले. मान यांच्यावर अजून कारवाई का केली नाही, असा सवाल केला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानं मान यांच्यावर सभागृहानं कारवाई करावी, अशी मागणी निर्मला सीतारामन यांनी केली. दरम्यान, मान यांनी व्हिडिओ शुटींगप्रकरणी लोकसभा सभापती महाजन यांच्यासमोर आपली बाजू मांडली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज