अ‍ॅपशहर

मुंबई काँग्रेसची सूत्रं भाई जगताप यांच्याकडे?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून संजय निरुपम यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता मुंबई प्रदेश काँग्रेसची सूत्रं तरुण-तडफदार नेते भाई जगताप यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

Maharashtra Times 25 Feb 2017, 6:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhai jagtap elected as mumbai congress president
मुंबई काँग्रेसची सूत्रं भाई जगताप यांच्याकडे?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून संजय निरुपम यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता मुंबई प्रदेश काँग्रेसची सूत्रं तरुण-तडफदार नेते भाई जगताप यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

काँग्रेसच्या नेत्यांवर, विशेषतः गुरुदास कामत गटावर निशाणा साधत संजय निरुपम यांनी महापालिका निवडणूक निकालाच्याच दिवशी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मला हरवण्याच्या नादात काही नेत्यांनी पक्षालाच पराभूत केलं, काँग्रेसला पक्षीय गटबाजीचाच फटका बसला, असा दावा त्यांनी केला होता. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ५१ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना-भाजपमधील फुटीचा आणि स्वबळावर लढण्याचा फायदा करून ही संख्या आणखी वाढवण्याची नामी संधी काँग्रेसला होती. परंतु, ते ५१ वरून ३१ वर घसरले. या निराशाजनक निकालानंतर लगेचच संजय निरुपम अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते.

काँग्रसचे निष्ठावान आणि आक्रमक कार्यकर्ते अशी भाई जगताप यांची ओळख असून सध्या ते विधान परिषदेचे सदस्यही आहेत. मुंबईत मराठीचा मुद्दा अजूनही प्रभावी ठरत असल्याचं पाहूनच काँग्रेसनं अध्यक्षपदासाठी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज