अ‍ॅपशहर

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेल यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राज्य पातळीवरील नेत्यांकडून माझं खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आज अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2022, 10:56 am
गांधीनगर : काँग्रेसचे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी अखेर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी आज धाडस करून काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, अशी माहिती हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hardik Patel resigns from Congress
हार्दिक पटेल यांचा राजीनामा


हार्दिक पटेल हे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. राज्य पातळीवरील नेत्यांकडून माझं खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला होता. अशातच काही वेळापूर्वी ट्वीट करत त्यांनी आपण काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं सांगितलं आहे. 'माझ्या या निर्णयाचं स्वागत माझे सर्व साथीदार आणि गुजरातमधील जनता करेल, असा मला विश्वास आहे,' असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. या निर्णयानंतर मी भविष्यात खऱ्या अर्थाने गुजरातसाठी सकारात्मक काम करू शकेन, असंही त्यांनी म्हटलं आहे.



दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या आधी युवा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पटेल समाजाच्या मतदारांमध्ये विशेष पकड असणाऱ्या हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्याने काँग्रेससमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज