अ‍ॅपशहर

नितीशकुमारांनी मानेवर चश्मा का लावलाय? लालूंनी काढला चिमटा

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या टीका केलीय. नितीशकुमार यांच्याकडे निवडणुकीत कुठलाही मुद्दा नसल्याचं लालू प्रसाद यादव म्हणाले. लालूंनी यासंदर्भात ट्विट केलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2020, 1:04 am
पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव ( lalu prasad yadav ) तुरूंगात असले तरी सातत्याने ट्विट करून ते बिहार विधानसभा निवडणुकीत ( bihar election ) सक्रिय आहेत. लालू प्रसाद यादव यांनी रविवारी मुख्यमंत्री नितीशकुमारांना ( nitish kumar ) मिश्किल शब्दांत चिमटा काढला. नितीशकुमार यांनी त्यांच्या शर्ट कॉलरमध्ये मानेवर चष्मा लावला आहे. लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांवर अशी टीका का केली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitish kumar lalu prasad yadav
नितीशकुमारांनी मानेवर चश्मा का लावलाय? लालूंचा मिश्किल शब्दांत चिमटा ( file photo )


शिवहर जिल्ह्यात शनिवारी जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्रीनारायण सिंह यांची गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्याकांडानंतर संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अजय आलोक यांनी ट्वीट केलं. या घटनेचा संदर्भ देत प्रश्न केला, काही आठवतंय का तुम्हाला?. आलोक यांनी इशाऱ्यांमधून आरजेडीवर हल्ला चढवला. 'निवडणुका येताच बिहारमध्ये जंगलराजमधील कटू घटनांची आठवण येते', असं ते म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांनी ट्विटमधून नितीश कुमारांना लक्ष्य केलं. नितीशकुमारांच्या राज्यात एका उमेदवाराची गोळ्या घालून हत्या केली गेली. यामुळे राज्यात कथित सुशासन आहे, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांवर केली. यासोबतच लालू प्रसाद यादव यांनी ट्विटमधून नितीशकुमारांना मिश्किल शब्दांत चिमटाही काढला. 'नितीशकुमारांच्या मानेवर शर्टच्या कॉलरमध्ये चश्मा आहे. यामुळे त्यांना फक्त मागंचं दिसतं. बिहारचं वर्तमान आणि भविष्य अंधारात ढकलून ते भूतकाळात जगत आहेत', असं लालू प्रसाद यादव म्हणाले.

'आम्ही काही दूधखुळे नाही', CAAवरील भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींची तिखट प्रतिक्रिया

६५ वर्षीय हरीश साळवे दुसऱ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्यावर, 'ही' होणार दुसरी पत्नी

नितीशकुमार यांच्याकडे निवडणुकीत कुठलाही मुद्दा नाहीए. यामुळे ते फक्त १५ वर्षांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकाळाची जनतेला आठवण करून देत आहेत, असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज